थोर समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांची आत्महत्या
- थोर समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांची आत्महत्या
आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य शीतल आमटे-करजगी यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे. डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर अनेक चर्चांना उत आला होता. त्यानंतर आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.
'संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिले आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुलीही दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे,' असं त्या निवेदनात स्पष्ट केलं होतं.
कोण आहेत शीतल आमटे?
डॉ. शीतल आमटे या विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा त्यांनीही जोपासला होता. २००३ मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला. शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या.
Comments
Post a Comment