मी होतो तेव्हा शिवसेना होती. म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्याचा बार फुसका, म्हसळयात शिवसेना संपली, तटकरेनी ती संपवली - कृष्णा कोबनाक • सत्तेत नसतानाही मी कामे करीत आहे. एकदा आमदार होऊ द्या मग दाखवतो माझी ताकद - कृष्णा कोबनाक
• मी होतो तेव्हा शिवसेना होती. म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्याचा बार फुसका, म्हसळयात शिवसेना संपली, तटकरेनी ती संपवली - कृष्णा कोबनाक
• सत्तेत नसतानाही मी कामे करीत आहे. एकदा आमदार होऊ द्या मग दाखवतो माझी ताकद - कृष्णा कोबनाक
म्हसळा (प्रतिनिधी) @raigadmat.page
म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता तो अतिशय अल्प पदाधिकारी यांच्या समवेत. राज्यात सरकार असून ही शिवसैनिक निराश. राज्यात सत्ता मिळावी म्हणून एकत्रित व मतदारसंघात एकला चला रे? काय ही अवस्था. महा विकास आघाडी सरकार हे जनतेच्या भल्या साठी स्थापन झाले नसून सर्व भ्रष्टाचारी नेते एकत्रित येऊन आपली प्रकरणेही भविष्यात बाहेर येऊ नयेत म्हणून राजकीय आश्रय घेण्यासाठी एकत्र आले आहेत. अशा प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा कोबनाक यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. शिवसेने कडून विकास कामांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. विकासच विसरले आहेत ते, हे सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच आप आपसात भांडणे करुन पडणार आहे. स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टी सोबत म्हणजे आमच्या पक्षा सोबत फारकत घेऊन राज्यात अनैतिक सरकार स्थापन केले ते जनतेला आजिबात आवडले नाही.
हे सरकार आल्यापासून महाराष्ट्राची अधोगती सुरू झाली आहे. अनेक विकास कामांना अडथळे निर्माण केली आहेत. तीन ती़घाडा काम बिघाडामुळे जनता त्रस्त आहे. स्वता शिवसैनिक बोलत आहेत की लोकांनी त्याना गावात बंदी केली आहे ,कारण हे काहीच करु शकत नाही. म्हसळा तालुक्यात मागील १० वर्षे काहीही विकास कामे केली नसून कोणत्या तोंडाने नगरपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका लढणार? स्वता त्यांचे शिवसैनिक बोलत आहेत. आता या तालुक्यात फक्त शतप्रतिशत भारतीय जनता पार्टी च या तालुक्यात विकास करणार या बाबतीत जनतेला विश्वास झाले आहे. मागील पाच वर्षे भाजपा सरकार मधून आम्ही खूप कामे केली आहेत. मुख्य मंत्री ग्रामसडक योजना, इजिमा रस्ते प्रजिमा करुन रस्ते सुधारणा, राष्ट्रीय पेयजल योजना अनेक गावात सामाजिक सभागृह, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना घरे, वीज कनेक्शन, गॅस योजना, शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, महीला बचत गट, निराधार योजना अशा योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले आहे. निसर्ग चक्रीवादळ व करोना महामारी मध्ये केंद्र सरकारने रेशनिंग व अन्य मदत दिली आहे पण महा विकास आघाडी सरकारने काय दिले? असा प्रश्न शिवसेना नेते मंडळी ला विचारण्यात आला आहे. फक्त भ्रष्टाचार केल्याचे बातम्या दररोज येत आहेत असे या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते श्रीकृष्णा कोबनाक यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारे दिले आहेत.
Comments
Post a Comment