म्हसळ्यात कदम फर्निचरला रात्री २ वाजता लागली आग ### आग विझवण्यासाठी म्हसळा नगरपंचायत कडे काहीही व्यवस्था नाही?



  • म्हसळा तालुक्यात कदम फर्निचर ला रात्री २ वाजता लागली आग

  • आग विझवण्यासाठी म्हसळा नगरपंचायत कडे काही(ही) व्यवस्था नाही. 

  • लवकरच या विषयी जनआंदोलन छेडण्यासाठी स्थानिक जनता एकत्र येऊन आंदोलन छेडणार आहेत असे समजते आहे. या साठी लवकरच "स्थानिक संरक्षण संघटने"ची स्थापना करु या अशी भावना "रायगड मत" कडे अनेक स्थानिक लोकांनी बोलून दाखवत आहेत आणि त्याचे नेतृत्व "रायगड मत" ने करावे अशी काही लोकांनी इच्छा व्यक्त केली.


म्हसळा (प्रतिनिधी) @ रायगड मत 


       म्हसळा दिघी रोड येथे कदम फर्निचर म्हणून दुकान आहे. लाकडापासून अनेक वस्तूं तयार करण्याचे एकमेव ठिकाण आहे. मात्र रात्री अचानक २ वाजता धूर येताना दिसू लागले. लागलीच येथील तै बा कॅटरर्स चे मालक श्री. नईम दळवी धावून गेले. त्यांच्या सॊबत इर्शाद भाई तांबे, जुनेद खान, शरीफ काका बाबु खान, सोनू अली फोऊझन दामाद, आसिफ अली, कॉन्स्टेबल आर जी राठोड, वि के सुंदर आणि खराटे हेही मदतीला धावून आले. या सर्व लोकांनी मदत करून ताबडतोब आग भडकण्यापासून वाचवली मात्र त्याअगोदरच लाकडी बरेच वस्तू जळुन खाक झाल्या होत्या. वरील मदतगार आग रोखावयास रात्री आले म्हणून अन्यथा अख्या इमारतीला आग लागली असते. त्यामुळे वरील मददगारांचे म्हसला तालुक्यातीळ नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे आणि नगरपंचायत वर मात्र लोकानी नाराजी व्यक्त केली आहे. raigadmat.page
       हि आग शॉर्टसर्किट मुले लागल्याचे म्हंटले जात आहे. मात्र प्रश्न आता हा विचारला जातोय म्हसळा नगरपंचायत सध्या काय करते? त्यांच्याकडे आग लागल्यास बचावासाठी काय व्यवस्था आहे? याची माहिती मिळविल्यास अशी माहिती मिळाली कि काहीही उपाययोजना किंवा अग्निशमन दल गाडी नगरपंचायत मध्ये नाही. मग काय करणार? शहर झपाट्याने वाढत आहे, शेकडो बिल्डिंग उभ्या राहत आहेत. त्यांना परवानगी कशी काय दिली जाते. सुरक्षेचे नियम धाब्यावर (डब्यावर) बसवून खुले आम इमारत बांधल्या जात आहेत आणि त्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे.  लवकरच या विषयी जनआंदोलन छेडण्यासाठी स्थानिक जनता एकत्र येऊन आंदोलन छेडणार आहेत असे समजते आहे. या साठी लवकरच "स्थानिक संरक्षण संघटने"ची स्थापना करु या अशी भावना "रायगड मत" कडे अनेक स्थानिक लोकांनी बोलून दाखवत आहेत आणि त्याचे नेतृत्व "रायगड मत" ने करावे अशी काही लोकांनी इच्छा व्यक्त केली. म्हसळा तालुका सध्या अनेक समस्यांनी ग्रासला आहे. येथे स्थानिकांना डावलून काही लोक नको दे उद्योग करून म्हसळ्याचे नाव खराब करीत आहेत. अशाना आत्ताच "चाप" लावला पाहिजे नाहीतर म्हसळ्याचा "समस्यांचा मसाला" करायला हे लोक मागे पुढे पाहणार नाहीत. raigadmat.page


Photo by - Naeem Dalvi (Press Reporter, Mhasla)




Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर