नागपूर ऐवजी मुंबईत हिवाळी अधिवेशन होणार


मुंबई :


        हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर होते. पण सध्याची राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता, ते नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७ डिसेंबर २०२० रोजी अधिवेशन घेता येईल का? किती दिवस घ्यायचे? याबाबत या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.


        राज्यातील करोनाची स्थिती लक्षात घेता ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठीकीमध्ये घेण्यात आला. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.


      बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही, असे मत व्यक्त केले.


         बैठकीत विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.


‘         करोनाच्या वातावरणात मुंबईतून आणि राज्यातून हजारो लोक अधिवेशनासाठी नागपूरला येणे धोक्याचे आहे’, असा सूर नागपुरमध्ये उमटत असल्याचे काही मंत्र्यांनी सांगितले होते. अधिवेशनासाठी कागदपत्रे, मनुष्यबळ नागपूरला हलवणे आणि तेथे येणाऱ्या अभ्यागतांची मोठी संख्या याचा ताण नागपूरवर पडू शकतो. त्यामुळे अधिवेशन मुंबईतच घ्यायचे की नागपूरला यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत लवकर निर्णय घ्यावा असे ठरले होते.  


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर