वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट
वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट
म्हसळा (प्रतिनिधी)@रायगड मत
म्हसळा तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटेसे गाव म्हणजे वाडांबा गाव. सामाजिक, शैक्षणिक कार्यात या गावचे म्हसळ्यात नेहमीच योगदान राहिले आहे. अत्यंत खडतर परिश्रम करणारे इथले ग्रामस्थ. याच गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. महादेव यशवंत महाडिक होय. आपल्या कुटुंबासाठी डोंबिवली येथे नोकरी करून गुजराना करणारे महादेव महाडिक यांनी आपल्या मुलीला वकील बनण्यास सांगितले. लेकीने आपल्या पित्याची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करत वकिलीची "एल.एल.बी" परिक्षा उत्तीर्ण केली. वाडांबा गावाचे नाव रोशन केल्यामुळे पित्याच्या डोळ्यात आनंदाआश्रू आल्याशिवाय राहिले नाहीत. कुमारी स्नेहल महादेव महाडिक हिने अथक प्रयत्नाने व जिद्दीने एल.एल.बी परिक्षा उत्तीर्ण करून गावाचे,तालुक्याचे आणि सर्वात मोठे परिवाराचे नाव उत्कृष्ट केल्याबद्दल सर्वच स्तरावरून शुभेच्यांचा वर्षाव होऊ लागला आहे. अनेक लोक तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देत आहेत. भविष्यात आपल्या खेडेगावासाठी काम करून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा मानस स्नेहल हिने व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment