खडसेंचे नाव पुन्हा अडचणीत? , राज्यपालांकडे तक्रार


मुंबई : 


विधानपरिषदेसाठी साठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाला रामराम करून पक्षात आलेले एकनाथ खडसे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र खडसेंचे नाव पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावावर आक्षेप घेतला आहे.


अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,, त्यात त्या म्हणाल्या की, प्रसारमाध्यमात राज्यपाल नियुक्तीसाठी १२ नावं झळकत आहेत, त्यातलं एक नाव एकनाथ खडसे आहे. मात्र खडसेंचे नाव येणं हे संतापजनक आहे, राष्ट्रवादी भ्रष्टाचारी नेत्याला पुन्हा राजकारणात राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याविरोधात निवेदन देण्यासाठी मी राज्यपालांची भेट घेतली. भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला खडसेंसारखे नेते पुन्हा राजकारणात आले आणि सक्रीय झाले तर काहीच अर्थ राहणार नाही, त्यामुळे माझे निवेदन आणि कागदपत्रे राज्यपालांना दिली आहेत.


तसेच एकनाथ खडसे जे भाषा वापरतात त्याबद्दल मी राज्यपालांना निवेदन दिलं आहे. राष्ट्रवादी प्रवेशावेळी जे शब्द वापरले “बाई दिली नाही तर मागे लावली” असं विधान शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि सुप्रिया सुळे असताना असं केले गेले. एकनाथ खडसेंना काही लाज आहे की नाही?, त्यांच्या या विधानानंतर मी शरद पवार, सुप्रिया सुळेंना मेसेज केला, शरद पवारांचा मला फोन आला खडसेंनी तुमचं नाव घेतलं नाही असं डिफेन्ड केले, पण माझं सोडा, पण कोणत्याही बाईबद्दल असं विधान करणं हे योग्य वाटतं का? असा सवाल मी शरद पवारांना केल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या.


तसेच एकनाथ खडसेंच्या विधानावर पोलिसांकडे तक्रार करूनही आद्यपही गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे भविष्यात न्यायालयाची लढाई लढावी लागणार आहे. तत्पूर्वी राज्यपालांकडे मी निवेदन दिलं आहे. राज्यपालांना आणखी काही पुरावे देणार आहे असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर