म्हसळा पोलीस सतर्क पोलीस, जनतेमध्ये पोलिसांबद्दल वाढला आदर  # सहाय्य्क पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली -  पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण आणि सहकाऱ्यांना अनेक गुन्हेगारांना पकडण्यात यश



  • म्हसळा पोलीस सतर्क पोलीस, जनतेमध्ये पोलिसांबद्दल वाढला आदर 

  • सहाय्य्क पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली - 
    पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण आणि सहकाऱ्यांना अनेक गुन्हेगारांना पकडण्यात यश


म्हसळा (जितेंद्र नटे) @raigadmat.page
      म्हसळा तालुक्यात काही ठिकाणी चोर आणि काही गुन्हेगारांनी काही दिवसापूर्वी धुमाकूळ घातला होता. मात्र या लबाड चोरांना आळा घालण्यात म्हसळा पोलीस सदैव उजवे राहिलेले आहेत. चोर कितीही शातिर असला तरी तो काही तरी पुरावा सोडतोच. हिच बाब हेरून म्हसळा पोलीस स्टेशनचे "सतर्क पोलीस" कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांनी आपलं बुध्दिकौशल्याचा वापर करीत तंत्रज्ञानाचा वापर करून म्हसळ्यात ज्या घरफोड्या झाल्या होत्या त्या चोरांना बेडया  ठोकल्या होत्या. तसेच ५९ लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणातील काही गुन्हेगार म्हसळा येथे दबा धरून बसले होते, त्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. अशा अनेक गुन्हेगारांना पकडण्यात संतोष चव्हाण हे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे सहकारी सूर्यकांत जाधव, विजय फोफसे, संदीप फोंडे, मल्हारी तोरमले हे यशस्वी झाले होते. अनेक गुन्ह्यामध्ये अनेक गुन्हेगारांना पकडण्यात म्हसळा पोलीस चांगली कामगिरी करीत आहेत. त्यातच कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांची मदत फार मोलाची आणि उजवी ठरली आहे. त्यांचे नेटवर्क जबरदस्त असल्यामुळे चोरांची पळताभुई थोडी झाली आहे. सध्या म्हसळ्यात प्रमाण घटले असून नागरिक - व्यापारी निश्चित फिरताना दिसत आहेत. 
      या सर्व कारणांमुळे म्हसळा पोलिसांचे म्हसळा तालुक्यातील नागरिक कौतुक करीत असल्याचेहि पाहायला मिळत आहे. पोलिसांवरचा विश्वास वाढला असून लोकांची मानसिकता आता बदलत चालली आहे. अनेक लोक आता बिनधास्त तक्रार करायला येत आहेत. नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा आदर वाढला असून भय कमी झाल्याचे चित्र दिसत सध्या दिसत आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण त्यांचे सहकारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगली कामगिरी करीत अनेक वेळा माणुसकीचे दर्शन घडवून आणले होते. या सर्व कामगिरीमुळे भविष्यात पोलिसांप्रती बघण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे चित्र समोर येत आहे. 
      सध्या दिवाळी चालू झाली आहे. पर्यटकही येऊ लागले आहेत. मात्र नागरिक घराबाहेर पडून बिनधास्त खरेदी विक्री करीत असताना दिसत आहेत. पोलिसांच्या चांगल्या कामगिरी बद्दल नागरिक आणि व्यापारी समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. 



  • सावधान म्हसळा, सतर्क म्हसळा पोलीस 


raigadmat.page



 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर