मुंबईत डान्सबारवर छापा
मुंबई :
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गोरेगाव परिसरातील स्टार बार अँड रेस्टॉरंटवर ( छापा मारला. रात्री 1 वाजेपर्यंत हा डान्स बार सुरूच होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बार रात्री 1 वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर स्टार बार आणि रेस्टॉरंटवर छापा टाकला असता 11 बारगर्ल्स डान्स फ्लोरवर डान्स करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी 11 बारगर्ल्ससह यावेळी 15 ग्राहक व अन्य 20 जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत डान्स बारमध्ये काम करणारे वेटर, सुपरवायझर, कॅशियर आणि मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
डीसीपी विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत हा बार सुरू होता. लॉकडाउनच्या काळात मुंबई पोलिसांनी केलेली ही पहिला कारवाई आहे.
Comments
Post a Comment