मोदी सरकारला जीएसटीतून 1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला


नवी दिल्ली (प्रतिनिधी)


            ऑक्टोबर केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. गेल्या आठ महिन्यांत प्रथमच केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्राला 1 लाख 5 हजार 155 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये सीजीएसटीमधून मिळालेल्या 19 हजार 193 कोटी, एसजीसीटीमधून मिळालेल्या 52 हजार 540 कोटी आणि आयजीएसटीमधून मिळालेल्या 23 हजार 274 कोटी रुपयांचा समावेश आहे. तर सेसच्या माध्यमातून सरकारला 8 हजार 11 कोटी रुपये मिळाले आहेत.


           कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मार्चमध्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोनाचा फैलाव होउ नये म्हणून प्रवास, उद्योगधंद्यांवर निर्बंध लादण्यात आले याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. उद्योगधंदेच ठप्प झाल्यानं केंद्राला मिळणार्‍या महसुलात प्रचंड मोठी घट झाली. त्यामुळे राज्यांना मिळणारा जीएसटीतील हिश्श्याची भरपाई करणं सरकारसाठी अवघड झालं. मात्र आता केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.


 जीएसटी भरपाईसाठी 1.1 लाख कोटींचे कर्जः केंद्र सरकारचा निर्णय
         गेल्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमध्ये जीएसटी 10 टक्क्यांनी वाढला आहे. आयातीच्या माध्यमातून मिळणार्‍या महसुलात गेल्या महिन्यात 9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. देशांतर्गत व्यवहारांचा विचार केल्यास या आघाडीवर महसूल 11 टक्क्यांनी वाढला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची तुलना केल्यास महसुलातील वाढ अनुक्रमे-14 टक्के, 8 टक्के आणि 5 टक्के इतकी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं दिसत आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर