दिवेआगरला पर्यटकांची पसंती; गुलाबी थंडीत निसर्गसौंदर्याची भुरळ, पर्यटक आले गावाला - राजू रिकामे : प्रेस प्रेस फोटोग्राफर
दिवेआगरला पर्यटकांची पसंती; गुलाबी थंडीत निसर्गसौंदर्याची भुरळ, पर्यटक आले गावाला
श्रीवर्धन (राजू रिकामे) : प्रेस प्रेस फोटोग्राफर
रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये थंडीने जोर धरला असून, श्रीवर्धनमध्ये किमान तापमानामध्ये घसरण होऊ लागली आहे. त्यामुळे सध्या या गुलाबी थंडीमुळे येथील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेताना पर्यटकांचा आनंद द्विगुणीत होत आहे. श्रीवर्धन परिसरात सायंकाळच्या वेळेस किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण वाढत आहे. हीच परिस्थिती आगामी पुढील दिवसांत कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता सध्या दिवाळी पर्यटन हंगामात दिवेआगर येथे पर्यटकांची वाढ झालेली दिसून येत आहे.
गुलाबी थंडीत निसर्गसौंदर्याची भुरळ : व्यावसायिकांनी व्यक्त केले समाधान; वीकेंण्डला होतेय गर्दी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरला पर्यटकांची पसंती; गुलाबी थंडीत निसर्गसौंदर्याची भुरळ. दिघी : विस्तीर्ण समुद्रकिनारा व पुरातन मंदिर असणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पर्यटन कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद होते. मात्र, अनलॉकमध्ये पर्यटन व्यवसाय सुरू झाले असून, मागील आठवड्यात दिवेआगर येथील पर्यटन सुरू झाले असताना, या शनिवार रविवार सुट्टीत फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना येथील गुलाबी थंडीमुळे निसर्गसौंदर्याने भुरळ पाडलीय. त्यामुळे आता पुन्हा पर्यटकांची हळूहळू रेलचेल सुरू झाली असून, येथील व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment