सरकारने एस टी कर्मचाऱ्यांचे केलेले पगार म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण – मनसे


 


मुंबई : 


      कोरोनामुळे  मागील ३ महिन्यांपासून पगारापासून वंचित असलेल्या एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेनंतर सोमवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी तात्काळ पगार वितरित करण्याची घोषणा केली. आणि यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.


      सरकारने एस टी कर्मचाऱ्यांचे केलेले पगार म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, ज्या 2 कर्मचाऱ्यांचे नाहक बळी गेले त्यांच्या परिवाराची होणारी परवड थांबवण्यासाठी सरकारने त्यांना तात्काळ भरीव आर्थिक मदत दयावी, तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. तसेच इथून पुढे कधीही पगार थकवण्याची नामुष्की येणार नाही याची तरतूद करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर