‘कोरोनाकाळात आरोग्य, सुरक्षितता व कल्याण’ या संकल्पनेतून ‘नवी मुंबई बंगाली असोसिएशन’तर्फे दुर्गा पूजा साजरी कार्यक्रमाचा निधी कर्करोग रुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी
‘कोरोनाकाळात आरोग्य, सुरक्षितता व कल्याण’ या संकल्पनेतून
‘नवी मुंबई बंगाली असोसिएशन’तर्फे दुर्गा पूजा साजरी
कार्यक्रमाचा निधी कर्करोग रुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी
नवी मुंबई(प्रतिनिधी)
वाशी येथील ‘द नवी मुंबई बंगाली असोसिएशन’ (एनएमबीए) या संघटनेने ४१ वर्षात पदार्पण केले आहे. ‘कोरोनाकाळात आरोग्य, सुरक्षितता व कल्याण’ या संकल्पनेतून ‘नवी मुंबई बंगाली असोसिएशन’तर्फे दुर्गा पूजा साजरी करण्यात आली.
जनसुरक्षा व जनकल्याण या क्षेत्रांत आम्ही कार्य करतो. या वर्षी आम्ही हा कार्यक्रम आमच्याच आवारात सामाजिक नियमांचे पालन करीत साजरा करणार केला जात आहे. ‘दुर्गोत्सव २०२०’ हा कार्यक्रम ‘द नवी मुंबई बंगाली असोसिएशन’ ची वेबसाईट, यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांमधून सर्व नागरिकांसाठी डिजिटल स्वरुपात सादर करण्यात आली आहे. प्रसादासाठी वेबसाईटद्वारे नोंदणी करण्याची सोय भाविकांकरीता उपलब्ध करण्यात आली आहे. कोलकता व मुंबई येथील गायकांचा ‘लाईव्ह कार्यक्रम’ या स्वतःच्या स्टुडिओमधून प्रक्षेपित करण्याचे ‘एनएमबीए’चे नियोजन केले असून हा कार्यक्रम नागरिकांना ऑनलाईन पाहता येईल येत आहे. तसेच या कार्यक्रमांमधून मिळालेला निधी एनएमबीए चालवीत असलेल्या एका केंद्रातील कर्करोग रुग्णांच्या उपचारांसाठी व पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष नेमाई गोराई यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment