पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सावरले - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल(प्रतिनिधी),
जागतिक कोरोना महामारीच्या संकटात देशा
देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, स्पर्धेचे आयोजक सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण संयोजक राहुल वैद्य, संध्या शारबिद्रे, राजेश भगत, विजेते स्पर्धक व पालक उपस्थित होते.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपच्या वतीने देशभरात सेवासप्ताह साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 'आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान' अंतर्गत आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘आत्मनिर्भर भारत : माझी संकल्पना’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारतीय सण’ असे विषय होते. पनवेल, उरण व कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी मर्यादित व निशुल्क प्रवेश असलेली हि स्पर्धा आठवी ते बारावीपर्यंत विद्यार्थी या गटासाठी अशी होती. या स्पर्धेच्या निकालाची घोषणा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ऑनलाईन एका कार्यक्रमात करण्यात आली होती.त्यानुसार या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम आज पार पडला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून रविंद्र कुलकर्णी व उमेश घळसाशी यांनी काम पाहिले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, आत्मनिर्भर भारताला प्रगतीच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असून कोरोना संकटातही देशातील प्रत्येक घटकाचा विचार त्यांनी केला. कोरोना संकटकाळ परिस्थितीत योग्य वेळी लॉकडाऊन त्याचबरोबर सर्व घटकासाठी पॅकेज व योजना देण्याचे काम त्यांनी करत देशाच्या नागरिकाला आधार दिला. मानवी संस्कृतीचा विसर पडू नये, हि संकल्पना घेऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी काम केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नेते लालकृष्ण अडवाणी तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची विचारसरणी रुजवली, असे सांगतानाच विविध क्षेत्रात जगाचे नेतृत्व भारत करू शकतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. त्यांनी पुढे बोलताना स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे आणि त्यांच्या पालकांचे आभार व्यक्त केले. बहुभाषिक व परंपरा असलेला आपला देश असून नवयुवकांचा भरणा असलेल्या या नवभारताच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी राहुल वैद्य व संध्या शारबिद्रे यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल संकल्पना विशद केली. तसेच सुहासिनी पवार आणि अमृता जोशी यांनी पालक मनोगत व्यक्त करताना या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल धन्यवाद दिले.
या स्पर्धेत वैदेही सुनिल पवार हिने प्रथम पारितोषिक (पाच हजार रुपये), आंचल गुप्ता आणि अर्पिता अरुण पाटील यांनी द्वितीय क्रमांक (तीन हजार रूपये) श्रुती शशिकांत चावरे हिने तृतीय (दोन हजार रुपये) तर उतेजनार्थ (प्रत्येकी पाचशे रुपये) पारितोषिक सिद्धी अनिल बेडेकर, अमित अतुल जोशी, श्रावणी मिलिंद गुजराथी, सृष्टी विक्रांत शिंदे व मोक्षदा दिनेश शेठ यांनी पटकाविले. त्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment