• कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि म्हसळा पोलीस सहकारी यांची जबरदस्त कामगिरी • मुलीची छेड काढणाऱ्या इसमास ताबडतोब केले जेरबंद


• कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आणि म्हसळा पोलीस सहकारी यांची जबरदस्त कामगिरी
• मुलीची छेड काढणाऱ्या इसमास ताबडतोब केले जेरबंद
• म्हसळा तालुक्यातील नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
• मुलीने त्या इसमास जाब विचारून दाखवली हिम्मत



म्हसळा (जितेंद्र नटे) raigadmat.page


          म्हसळा तालुक्यात आज एक निंदनीय घटना घडली. एका 32 वर्षीय नदीम महंमद साहेब मिठागरे या इसमाने एका मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करीत, तिच्याशी इच्छा नसताना संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी मोबाइल क्रमांक मागून तिच्याशी असभ्य वर्तन केले. 
          याबाबतीत अधिक माहिती देत असताना म्हसळा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी 'रायगड मत' शी बोलताना सांगितले की, ती मुलगी क्लासला जाण्यासाठी आली होती. मात्र क्लास बंध असल्यामुळे ती कॉम्प्लेक्स च्या बाहेरच उभी राहिली. इतक्यात एक इसम येऊन तिच्याशी जबरदस्ती संवाद साधण्याचा प्रयत्न करीत मोबाईल क्रमांक मागू लागला. मात्र तिने विरोध केला व आरडा ओरडा केला. याचवेळी दिघी नाक्यावर ड्युटीवर असणारे वाहतूक पोलीस देविदास कारखेले आणि पोलीस हवालदार कासार यांनी यांनी तात्काळ आपले कर्तव्य बजावत त्या इसमास पकडले आणि त्या देवघर कोंडची रहिवाशी असणाऱ्या मुलीचे रक्षण केले. आज खरंच पोलीस ब्रीदवाक्य "सदरक्षणाय खल निग्रहणाय" म्हसळा पोलिसांनी खरे करून दाखवले. त्यामुळे म्हसळा तालुक्यात त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 
        आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गु. र. न. 51/20 आयपीसी 354 ड, पोक्सो कलम 12 प्रमाणे आरोपी ला अटक करण्यात आले असून उद्या माणगाव सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक यांनी "रायगड मत" शी बोलतांना सांगितले. सध्या हाथरस बलात्कार प्रकरण गाजत असून सर्वत्र महिला सुरक्षा बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र म्हसळा पोलिसांनी केलेल्या कामगिरी बद्दल जनता म्हसळा पोलिसांना शाबासकी देताना ऐकायला मिळत आहे. नेहमी कुठलेही प्रकरण असो समाज-समाजाची लोक जमून घटनास्थळी जमाव करून वातावरण तंग करीत असत. मात्र पोलिसांनी ताबडतोब कारवाई करीत सर्वानाच जबरदस्त असा मॅसेज दिला आहे. कायद्यापुढे कुणीही मोठा नाही. यापुढेही पोलीस अशीच कामगिरी करतील यात शंकाच नाही.


      सद्या रायगड जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक म्हणून डॅशिंग नेतृत्व करणारे अशोक दुधे साहेब आल्यापासून रायगड जिल्ह्यातील जनतेमध्ये खुशीचे वातावरण दिसत आहे. त्यांच्यामुळे रायगडच्या पोलिसांचे मनोधैर्य वाढल्याचे चित्र दिसत आहे.


raigadmat.page


Editor - Jitendra Nate


 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर