कांदा आयातीमुळे दरवाढीवर नियंत्रण


पुणे, प्रतिनिधी,


      'मार्केट यार्डात मंगळवारी ३५ ते ४० ट्रक जुन्या; तसेच नवीन काद्याची आवक झाली. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा परिसरातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. जुन्या कांद्याचे गेल्या आठवड्यात एका किलोसाठी ८५ रुपये दर होते. आता ते दर ६५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या काही दिवसांत कांद्याच्या सुरू असलेल्या घसरणीमुळे २० ते २२ रुपयांपर्यंत दर उतरले आहेत. नवीन कांद्याची मंगळवारी ५ ट्रक आवक झाली असून त्यांना ३०० ते ३५० रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. इराणचा कांदा आयात करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्याने वाढलेले दर घसरण्यास सुरुवात झाली आहे,' अशी माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.


      कांद्याची निर्यातबंदी, सर्वदूर थांबलेला पाऊस; तसेच कांदा साठवणुकीवर आलेल्या मर्यादेबरोबर केंद्र सरकारने कांदा आयातीच्या घेतलेल्या निर्णयामुळे अखेर कांद्याच्या दरात घसरण सुरूच राहिली आहे. ८५ वरून ६० रुपयांपर्यंत कांद्याचे दर खाली घसरल्याने अवघ्या काही दिवसांत २० ते २२ रुपयांनी दर उतरले आहेत. कांदा आयातीमुळे दर आणखी घसरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.


      इराणचा कांदा देशात आयात करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने देशातील बाजार समित्यांमध्ये येत्या १५ दिवसांत हा कांदा पोहोचेल. मुंबईत हा कांदा आला असून येत्या ८ दिवसांत पुणे बाजार समितीत येईल. पूर्वीही तुर्की, इराण, इजिप्तमधून कांद्याची आयात झाली होती. त्यामुळे यंदाही पुन्हा कांद्याचे दर खाली येतील, असेही पोमण यांनी सांगितले. स्थानिक भागातील जुना कांद्यापैकी ३० टक्के कांदा उच्च प्रतीचा असून त्यालाच ६०० रुपयांपर्यंत दर मिळाले. उर्वरित ७० टक्के कांदा कमी प्रतीचा असल्याने त्याला कमी दर मिळाले आहेत. कमी प्रतीचा कांदा छोट्या मोठ्या हॉटेलचालक, हातगाडी, स्टॉलवाले खरेदी करतात. चांगल्या दर्जाच्या कांद्याला परराज्यातून मागणी होत आहे, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.


      कांदा साठवणुकीवर सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यात पाऊस थांबल्याने कांदा आयातीमुळे आता दरवाढीवर नियंत्रण येऊ लागले आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर