म्हसळ्यात पुन्हा एक विनयभंगाची घटना, आरोपीला केले जेरबंद


म्हसळा / रायगड मत (प्रतिनिधी)


      म्हसळा तालुक्यात अनेक ठिकाणी या आधी विनयभंग, 
पॉक्सोच्या घटना घडल्या आहेत. मात्र खामगांव येथे घडलेली घटना फार विचित्र आहे. ऐकतांना सुध्दा अंगावर शहारे येतात. एका चुलत भावानेच आपल्या चुलत बहिणीचे विनयभंग केले आहे. अत्यंत लज्जास्पद कृत आम्ही बातमीत लिहूही शकत नाहीत आणि पोलीस सांगू शकत नाहीत. 
   


        घडलेल्या घटनेची माहिती म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे सांगातांना म्हणाले की, ‘‘खामगांव येथील आदिवासी वाडी मध्ये राहत असणा-या एका 20 वर्षीय तरुण आरोपी दिपक पवार, वय वर्षे 20 याने आपल्या पीडित चुलत बहिण झोपलेली असतांना रात्री 2 वाजता अत्यंत घाणरडे कृत्य करीत त्या पिडीत तरुणीचा विनयभंग केला. ही घटना घडल्याच्यानंतर म्हणजे 27 ऑक्टोबरला पिडीत मुलीने म्हसळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून एफआरआय नोंदविली.


       लागलीच पोलिसांनी एफआरआय 56/20 आय.पी.सी. 354 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करीत पीडित मुलीला धीर दिला. तिला धिर देत हकीकत जाणून घेतली आणि ताबडतोब आरोपी दिपक पवार  याला अटक केली. त्याला श्रीवर्धन कोर्टात हजर केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. मिलींद सुर्वे (खामगांव दूर क्षेत्र) हे करीत आहेत.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर