सर्वांसाठी लोकल केव्हापासून?


मुंबई, प्रतिनीधी


मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर  अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर खासगी व सहकारी बँकांतील कर्मचारी, त्यानंतर महिला प्रवासी, वकील, खासगी सुरक्षा रक्षक यांनाही आता लोकलची दारे काही अटींसह उघडण्यात आली आहेत. त्यानंतर आज राज्य सरकारने सर्वात मोठे पाऊल उचलत सर्व प्रवाशांसाठी लोकल प्रवासाचा प्रस्ताव रेल्वेपुढे ठेवला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त यांना हा प्रस्ताव देण्यात आला आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत आणि पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.


सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरच लोकल ट्रेनचे दार उघडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्य सरकारने अशी परवानगी देणारे पत्र रेल्वेला पाठवल्यानंतर रेल्वेने त्यावर तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत एक महत्त्वाचे ट्वीट मध्य रेल्वे कडून करण्यात आले आहे. 


दरम्यान, सर्व महिला प्रवाशांसाठी लोकलसेवा सुरू करण्यावरून बराच वाद रंगला होता. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीचे कारण देत त्यात दिरंगाई करण्यात आली होती. त्यामुळे आता सर्वच प्रवाशांसाठी लोकलचे दरवाजे खुले करण्यासाठी रेल्वे किती दिवसांचा वेळ घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राज्य सरकारचा आजचा प्रस्ताव...



  1.  कोविड-१९ च्या अनुषंगाने असलेले नियम पाळून सर्व प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी.

  2. वैध तिकीट किंवा पास असलेला कोणताही प्रवासी सकाळी ७.३० च्या आधी लोकलने प्रवास करू शकतात.

  3. सकाळी ८ ते १०.३० या वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (वैध क्यू आर कोड असेल तरच) तसेच आयकार्ड व वैध तिकीट वा पास असणारी व्यक्ती प्रवास करू शकतो.

  4. सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत वैध तिकीट वा पास असलेला कोणताही प्रवासी प्रवास करू शकतो.

  5. संध्याकाळी ५ ते ७.३० वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (वैध क्यू आर कोड असेल तरच) तसेच आयकार्ड व वैध तिकीट वा पास असणारी व्यक्ती प्रवास करू शकते.

  6. रात्री ८ वाजल्यानंतर शेवटच्या लोकलपर्यंत तिकीट वा पास असलेली कोणतीही व्यक्ती लोकलने प्रवास करू शकते.

  7. दरतासाला एक महिला विशेष लोकल सोडण्यात यावी.

  8. मागणीनुसार संभाव्य गर्दी टाळण्यासाठी लोकलची संख्या वाढवण्याचे नियोजन करावे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर