• म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्यामुळे संचारला उत्साह... • शिवसेनेचे पदाधिकारी पेटून उठले, प्रत्येक गावात काम टाकणार, यामुळे पुन्हा एकदा शिवसेना फोफावणार • महादेव पाटील तालुका अध्यक्ष झाल्यापासून शिवसेना वाढली.
• म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्यामुळे संचारला उत्साह...
• शिवसेनेचे पदाधिकारी पेटून उठले, प्रत्येक गावात काम टाकणार,
यामुळे पुन्हा एकदा शिवसेना फोफावणार
• महादेव पाटील तालुका अध्यक्ष झाल्यापासून शिवसेना वाढली.
म्हसळा @ रायगड मत
raigadmat.page
गेले अनेक दिवस कोरोनामुळे राजकीय पक्षात शांतता होती, मात्र जसा कोरोना कमी होऊ लागला तसे राजकीय पक्ष आपली मोट पुन्हा बाहेर काढू लागले आहेत. म्हसळा तालुक्यात नगरपंचायतचे मतदान जवळ आले? तसे आढावा बैठकी, मेळावे व्हायला सुरुवात झाली.
raigadmat.page
आठ महिन्यानंतर शिवसेनेचा मेळावा झाला, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचा झाला होता, बहुतेक आता काँगेसचा होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. मेळाव्याचा हेतू असतो कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा, उत्साह निर्माण करण्याचा. मात्र इथे झाले भलतेच इथे काम न आणणाऱ्या नेते लोकांवरच पदाधिकारी आणि कार्यकर्ते गरजले. त्यामुळे शिवसेनेमधील धुसफूस समोर आली. बरेच दिवस आतमध्ये काही तर शिजत होते मात्र या मेळाव्यात ते बाहेर आले. मात्र यामुळे नेते आणि पदाधिकारी जागे झाले आहेत.
raigadmat.page
तालुका अध्यक्ष महादेव पाटील यांनी आपल्या पाटील शैलीत प्रस्तावनापर भाषण केले, "आपल्याला शिवसेना वाढवायची असेल तर गावोगावी कामे टाकणे गरजेचे आहे, ही कार्यकर्त्यांची मागणी त्यांनी पहिल्या प्रथम मांडली. आपल्या म्हसळा तालुक्यातील व्यथा त्यांनी मांडल्या.
लागलीच विनोद घोसाळकर यांनी धीर देत सांगितले की, " पालकमंत्री आपली अडवणूक करीत आहेत, मात्र यावर जालीम उपाय म्हणून उद्धव साहेबानी आपल्याला संपर्क मंत्री अनिल परब हे दिले आहेत. थोड्याच दिवसात आमदार निधी नाही दिला तर थेट मुख्यमंत्री निधी आणू पण कामे 100 टक्के आणू. त्यामुळे शिसैनिक एकदम हुरळून गेले. एक आशेचा किरण त्यांना दिसला. जोरदार टाळ्या पडल्या.
नंतर म्हसळा तालुक्याची बुलंद तोफ नंदूभाई शिर्के उठले नुसते उठले नाहीत तर सडेतोड भाषण केले. कार्यकर्ते का नाराज आहेत याचा पाढाच मांडला. प्रत्येक गावात काम पाहिजे अन्यथा पुढे मुश्किल? असा सवाल ही त्यांनी आलेल्या नेत्यासमोर मांडला. आणि याची दखल ही त्यांनी घेतली.
अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपले मत (रायगड मत) मांडले, "की जर गावात कामच नाही टाकले तर सभासद कसे होणार? कशी वाढणार शिवसेना? लोक सगळी राष्ट्रवादी कडे वळत आहेत. कारण ते कामे टाकत आहेत.
आपली अवस्था त्या शेकाप आणि काँग्रेस सारखी होईल., हळू हळू राष्ट्रवादी वाले शिवसेना संपवतील. म्हणून आताच जागे झाले पाहिजे. असे बालशेठ करडे आपल्या जबरी आवाजात कडाडले. ते पुढे म्हणाले की, तटकरे काय गेम करेल सांगू शकत नाही. कधी कुणाच्या खांद्यावर हात टाकून गोड बोलून आपल्याला बांधावर बसवेल सांगता येत नाही. सरकार मध्ये आघाडी आहे, जिल्हा परिषद मध्ये नाही. त्यामुळे आता सावध व्हा अपापसातले हेवे दावे विसरा आणि कामाला लागा असे सांगण्यास करडे विसरले नाहीत.
या कार्यक्रमाला युवासेनेचे अध्यक्ष विकास गोगावले आले होते, त्यांनी तरुणांना जागृत राहण्याचे सल्ला देत नक्किच शिवसेना श्रीवर्धन मतदार संघात वाढवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे संबोधित करण्यास उठले, "आपल्या अभ्यास पूर्ण भाषणात विकास कामे आपण आणणारच आणि श्रीवर्धन मतदार संघात पुन्हा एकदा शिवसेनेचा आमदार बसवणारच असे ठणकावून सांगितले. कार्यकर्ते पदाधिकारी यांनी नाराज न होता आपली टीम बांधावी. लवकरच विकास कामे प्रत्येक गावात दिसतील. मुख्यमंत्री आपले आहेत. कामे सरकार करीत आहेत. निधी मुख्यमंत्री साहेब देत आहेत. मात्र तटकरे तिकडे लोटांगण घालून कामे आणतात आणि नाव राष्ट्रवादीचे आपल्या पक्षाने कामे आणली असे सांगतात. चक्री वादळाचा निधी मुख्यमंत्री साहेबानी ताबडतोब मंजूर केला मात्र क्रेडिट खासदार तटकरे यांनी खाल्ला. त्यामुळे सावध व्हा, जागे व्हा. उद्या इलेक्शन आहे म्हसळा नगरपंचायतचे त्यामध्ये 100 टक्के आपले नगरसेवक निवडून आणू आणि आपली ताकद दाखवून टाकू, असे म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारलेले पाहायला मिळाले.
शेवटी आभार मानून कार्यक्रम संपवण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक दिगग्ज नेते स्टेज वर होते. माजी आमदार तुकाराम सुर्वे, क्षेत्र संघटक रवींद्र लाडसाहेब,कृष्णा म्हात्रे ,शहर अध्यक्ष पानसरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment