पोषण अभियान जनजागृतीत मोहिमेत "कुंबळे" अंगणवाडीचा सहभाग
म्हसळा :प्रतिनिधी
केंद्र सरकार व राज्यसरकार स्वयंसेवक संस्थानाच्या वतीने देशभरात १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असे एक महीना राबवत असलेल्या पोषण महीना म्हणून जाहिर झाले होते.याचे अनुसरण म्हसळा तालुक्यातील कुंबळे अंगणवाडी येते २९ सप्टेंबर रोजी पोषण जनजागृती मोहिमेत सहभाग घेतले होते.यावेळी "सही पोषण देश रोशन" चे नारा देत म्हसळा तालुक्यातील मौजे कुंबळे येथे अंगणवाडी मध्ये कुपोषण ,सुपोषण ,बाळसंगोपण ,बाळसंरक्षण तसेच आरोग्यशिक्षण देत कौतुकिय जनजागृती करण्यात आली.
केंद्र सरकारच्या महीला बाळविकास विभागाच्या वतीने राबवत येणाऱ्या चाइल्ड लाईन जिल्हा प्रकल्पाची समन्वय संस्था असून त्याचेच नियमाचे पालन करत कुंबळे अंगणवाडीत जनजागृती केली तसेच ३० सप्टेंबर पर्यत नियमित करुन या मोहिमाच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण झाल्याचे माहीती ICDS कळबसकर मँडम यांनी दिली.
यावेळी कुंबळे अंगण वाडी सेविका सौ.निहारीका सातम,प्रतिभा बांद्रे ,सौ.योगीता य.जाधव अंगण वाडी सेविका (कोंझरी)सौ. स्नेहल संदेश शिगवण (तळवडे )सौ.कल्याणी कि.पालांडे (कोळे) सुरेखा बोतरे (आड़ी) प्रमिला कदम (आडी ,जंगम वाडी ) रत्नमाला तांबे (पानवे )शारदा पवार (केल्टे )स्तनदा माता ,आराध्या डींगणकर तसेच ग्रामस्थ श्री.यशवंत जाधव ,प्रविण शिर्के ,सुषमा पवार ,रसिका शिर्के ,या मोहिमेत आवर्जुन उपस्थिति दर्शवली ते प्राथमिक शाळेचे शिक्षक किशोरीमुली व कोठरे गुरुजी,
जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्यास सर्व अंगणवाडी सेविका ,मददतनीस व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे कळबसकर मॅडमने सर्वांचे आभार मानले.
Comments
Post a Comment