महापालिकेच्या सभापतीपदी भाजप आरपीआयचे वर्चस्व
पनवेल (प्रतिनिधी)
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे संतोष शेट्टी, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी मोनिका महानवर तसेच प्रभाग समिती 'अ' सभापतीपदी अनिता पाटील, प्रभाग समिती 'ब' सभापतीपदी समिर ठाकूर, प्रभाग समिती 'क' सभापतीपदी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती 'ड' सभापतीपदी सुशील घरत यांची निवड झाली आहे.
या नवनिर्वाचित सभापतींचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्त्यानी अभिनंदन केले.
पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसूम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती शत्रृघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत आणि तेजस कांडपीळे यांचा यशस्वी कार्यकाळ संपुष्टात आल्याने या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या. दिनांक २६ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पदांची निवडणूक आज (दि. २८) ऑनलाईन पद्धतीने झाली.
स्थायी समिती सभापतीपदासाठी संतोष शेट्टी, आणि महिला व बाल कल्याण सभापतीसाठी मोनिका महानवर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. अ, ब, क, ड, या प्रभाग समितीसाठी अनुक्रमे अनिता पाटील, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे व सुशिला घरत यांनी अर्ज दाखल केला होता. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेत भाजप-आरपीआय ची एक हाती सत्ता असल्याने या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित होता फक्त त्याची औपचारिकता शिल्लक होती. त्यानुसार आज निकाल जाहीर होऊन पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती, महिला व बाल कल्याण सभापती व प्रभाग समिती सभापतीपदी भाजप आरपीआयचे वर्चस्व स्पष्ट झाले.
Comments
Post a Comment