• म्हसळा येथे लग्नाचे आमिष दाखवून केली जबरदस्ती .... • मुलीने तक्रार केल्यावर गुन्हेगाराला झाली अटक
• म्हसळा येथे लग्नाचे आमिष दाखवून केली जबरदस्ती ....
• मुलीने तक्रार केल्यावर गुन्हेगाराला झाली अटक
म्हसळा (रायगड मत / जितेंद्र नटे )
raigadmat.page
गेली अनेक दिवस लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये म्हसळा अग्रेसर राहिला आहे. मात्र म्हसळा पोलीस वेळीच गुन्हेगाराच्या नाड्या ठोकत आहेत. यापूर्वी ही घटना घडल्या असाव्यात मात्र त्या दाखल झाल्या नसाव्यात. मात्र म्हसळा सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे आल्यापासून अनेक गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. घडलेली घटना "रायगड मत"ला सांगताना पोलीस निरीक्षक म्हणाले की, "एका मुलीची आणि तरुण मुलाची इंस्टाग्रामवर मैत्री जुळली त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तो मुलगा व ती मुलगी दोघेही फिरायला गेले आणि दिवेआगर बीच व हडपसर येथील समुद्रा एक्झिकेटीव्ह हॉटेल येथे नेऊन त्यामुलाने त्या मुलीवर लैगिंक अत्याचार केले. अशी त्या मुलीची तक्रार आहे.
पुढे माहिती देताना धनंजय पोरे यांनी सांगितले की, "1 जुलै 2017 ते 30 एप्रिल 2019 रोजी या कालावधीत ही घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्राम व इंटरनेट वरून त्या तरुणाशी फ्रेंडशिप झाली. या फ्रेंडशिप चे रुपांतर पुढे प्रेमात झाले. मात्र त्या तरुणाने तिचा गैरफायदा घेत तिला लॉज वर घेऊन गेला आणि बळजबरी केली तिने नकार देताच त्याने तिला मारहाण केली. त्या मुलीने म्हसळा पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब गुन्हा नोंदवत 52/20 IPC 376 507 POCSO 4,8 अशी गुन्ह्याची नोंद करीत आरोपीस अटक करण्यात आली. असे सांगत पुढील तपास चालू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली.
मात्र विषय इथेच संपत नाही "हाथरस" प्रकरण ताजे असताना आणि चार दिवसापूर्वी अत्याचाराची घटना घडली असताना परत तालुक्यात अश्या घटना घडतातच कश्या? असा प्रश्न निर्माण होत आहे. इंटरनेट व्हाट्सअप, फेसबुक मुळे तरुण मंडळी जरा जास्तच बिघडली आहे का ? की आजच्या गुन्हेगारांना कायद्याची भीतीच राहिली नाही? म्हसल्या सारख्या छोट्याश्या तालुक्यात घटना घडायला लागल्या म्हणजे काय? असा चिंताजनक व काळजीवाहू प्रश्न पालकवर्ग आणि म्हसळ्यातील सुसंस्कृत नागरिक "आपले मत - रायगड मत"शी व्यक्त करताना दिसत आहेत.
raigadmat.page
https://www.facebook.com/groups/696441374503491
https://www.youtube.com/channel/UCLPo_3uBeBf7J7JAxssbZlg?view_as=subscriber
भारत सरकार केंद्र शासन मान्यताप्राप्त "रायगड मत" या वर्तमानपत्राच्या raigadmat.page हि website दररोज वाचा, तसेच फेसबुक आणि You Tube चॅनलचे मोफत Subscribe व्हा आणि म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगांव, रोहा, अलिबाग, मुरुड, महाड, पनवेल आणि इतर तालुक्यातील - रायगड जिल्यातील ताज्या घडामोडीचे Update मिळवा. तेही अगदी मोफत. (सामान्य जनतेचे लोकमत - रायगड मत) *जाहिराती साठी संपर्क करा raigadmat@gmail.com
Comments
Post a Comment