मुंबई स्कूटी चोराला पकडण्यात, म्हसळा पोलिसांना यश
म्हसळा / रायगड मत (प्रतिनिधी)
24 ऑक्टोबरला म्हसळा पोलिस चेकपोस्टवर एक स्कूटी चोरना-या चोराला पोलिसांनी पकडले. मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशी की, म्हसळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पोरे आणि त्याचे सहकारी पो.ह. संतोष चव्हाण, पो. मोरे, पो.ह. कासार, पो.ह. वैभव पाटील, पो. नाईक. आनंद रोठोड, पो. शि. फोंडे हे गस्त घालत होते.
पहाटे 3 वाजता एक हेड लाईट नसलेली स्कूटी येतांना पोलिसांना दिसली. ताबडतोब पोलिसांनी गाडी अडवत चौकशी केली. चौकशी दरम्यान असे आढळले की ती गाडी त्या चालकाची नव्हतीच. तर ती स्कूटी मुंबईवरून चोरी करून त्याने आणली होती. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच तो चोर बकाबका वकू लागला आणि घाबरून खरी हकीकत सांगू लागला. त्याने ती स्कूटी एल.टी.मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केली होती. या आरोपीचे नाव अंकुश यशवंत गोमाने असे असून रा. 133 प्रीन्सेस स्ट्रीट, कालबादेवी, मुबंई येथील रहिवाशी आहे. ताबडतोब पोलिसांनी एल.टी.मार्ग पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली. तेथे स्कूटी चोरीची 572/20 अशी एफआरआय नोंद असल्याची माहिती मिळाली. लवकरच एल.टी.मार्गचे पोलीस निरीक्षक म्हसळा पोलिसांनी भेटावयास येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. रायगड जिल्हयाचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे साहेब आल्यापासून संपूर्ण रायगड जिल्हयात गुन्हेगारांना वचक बसावयास सुरुवात झालेली दिसत आहे. त्यांच्याम्हणण्यानुसार अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्याचे आदेशच त्यांनी सोडले आहेत. त्यांच्या आदेशाी अमंलबजावणी करत म्हसळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री. धनंजय पोरे आपले कर्तव्य बजावत आहेत.
अशीच कामगिरी म्हसळा पालिसांनी करावे भावना म्हसळ्याची जनता व्यक्त करतांना दिसत आहे.
Comments
Post a Comment