मंदिरे उघडण्यासाठी सरकार का घाबरत आहे ? माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल


नगर, प्रतिनीधी


         मंदिरे उघडण्यासाठी सरकार का घाबरत आहे? त्यांना परमेश्वराची एवढी का भीती वाटत आहे? असे प्रश्न उपस्थित करीत विखे पाटील म्हणाले, 'प्रत्येक धर्माला आपल्या देवाला जायचे स्वातंत्र्य आहे. राज्यात मॉल, जीम, मदिरालय उघडता, पण मंदिर उघडण्यास सरकार परवानगी देत नाही. सरकार एवढे का घाबरत आहे? त्यांना परमेश्वराचा कोप होईल अशी भीती वाटते का?' असेही विखे म्हणाले. 'मंदिरे उघडण्याचा केवळ भावनिक मुद्दा नाही. तर मंदिर बंद असल्याने अनेक लोकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे सर्वार्थाने विचार केला पाहिजे. परंतु, सरकारचा मंदिर उघडण्याबाबत हेकेखोरपणा चालला आहे. ही भूमिका योग्य नाही, याची मोठी किंमत या सरकारला मोजावी लागेल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.


         'शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पडल्यानंतर ही माझ्या शिवसैनिकांनी पाडली, असे समर्थन केले होते. मात्र आज शिवसेनेचा विचार केला तर त्यांनी सर्व मुद्दे सोडून दिले आहेत. हिंदुत्व सोडले आहे. सत्ता टिकवण्यासाठी आपली सर्व तत्वे गुंडाळली आहेत,' असा घणाघात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 'महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राज्यातील जनता याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,' असेही ते म्हणाले. नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेण्यासाठी विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर तोफ डागली.


       दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले होते. त्याबाबत विखे यांना विचारले असता ते म्हणाले, 'शिवसेनेचा विचार केला तर त्यांनी सत्ता टिकवण्यासाठी सर्व मुद्दे सोडून दिले आहेत, हिंदुत्व सोडले आहे. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पडल्यानंतर ही माझ्या शिवसैनिकांनी पाडली, असे समर्थन केले होते. मात्र आज शिवसेनेने सगळ्याच भूमिकेत बदल केला आहे. सत्ता टिकवण्यासाठी सर्व तत्त्वे गुंडाळली आहेत. हे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे. राज्यातील जनता याचा जाब विचारणार आहे.'


ही तर वादळापूर्वीची शांतता
विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकविण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यावर बोलताना माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले 'शिवसेनेचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता दिसतेय. महाविकास आघाडीत का बेबनाव झाला? तो का वाढत आहे? स्वबळावर लढण्याचा नारा का देत आहेत? राज्यातील जनतेसाठी नव्हे तर मूठभर लोकांना सत्ता टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. स्वबळाचा नारा द्या. हिंदुत्व सोडा, काही फरक पडत नाही, अशी भूमिका या राज्यातील सरकार मधील तिन्ही पक्षांनी घेतली आहे.'


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर