उलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय तातडीने सुरु करा  -  दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची मागणी 


 

पनवेल  प्रतिनिधी उलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय तातडीने सुरु करण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार लोकनेते रामशेठ यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. 


       या संदर्भात समितीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सध्या वेगाने कोरानाचा प्रसार राज्यात आणि देशातही सुरु आहे. सिडको विकसित करीत असलेल्या उलवे नोड, तसेच उरण-पनवेल परिसरात आज कोरोनाची झपाट्याने लागण सुरू असून नागरिक भयभीत झाले आहेत. येथे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. क्वारंटाईन सेंटरही नाही. जिल्ह्यातील रुग्णांची वाट पाहता यंत्रणा हतबल झाली आहे. रुग्णालयांत जागा शिल्लक नाहीत. अनेक नागरिक उपचाराअभावी घरीच आहेत तसेच खासगी दवाखान्यात लुटमार सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे उलवा नोड, उरण,पनवेलतील नागरिकांना तातडीने कोविड रुग्णालयाची गरज आहे. तसेच त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड आयसीयू  उभारण्याची गरज आहे, जेणेकरून अत्यवस्थ रुग्णाला तिथल्या तिथे उपचार मिळतील आणि त्याचा जीव वाचेल. सेक्टर ७ येथे विना रहिवासी क्षेत्रात रिलायन्सच्या दोन तयार अद्ययावत असे व्यावसायिक संकुल व सेक्टर २४ उलवे नोडमधील सिडकोने बांधलेली रायगड जिल्हा परिषदेची उलवे तरघर-कोंबडभुजे शाळेचा शासनाने सर्वे करुन शक्य असल्यास तेथे २०० बेड्सचे तात्पुरत्या स्वरूपाचे कोव्हीड हॉस्पिटल उभारण्यात यावे. रोटरी क्लब ऑफ उलवे नोडच्या विडिओ कॉन्फरन्स दवारे झालेल्या बैठकीत डॉक्टर्स प्रतिनिधींनी बोलताना, जर या सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांनी स्वतः व बाकी लागणारा स्टाफ उपलब्ध करून शासन तत्वावर हे सेंटर उभारण्यासाठी पूर्णतः सहकार्य करण्याचे  आश्वासन दिले आहे. सिडकोने मुलुंड येथे २००० बेड्सचे व ठाणे येथे १६०० बेड्सचे अद्ययावत असे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड रुग्णालय उभारले आहेत. त्याच पद्धतीने नवी मुंबई, उलवे नोड, उरण व पनवेल परिसरात हे कोविड हॉस्पिटल उभारण्यात यावे, असे निवेदनात नमूद केले आहे 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर