आठवण २६ जुलैच्या प्रलयाची..मुंबईचा जलप्रलय..
आज 26 जुलै 2020.पंधरा वर्षांपूर्वी याच दिवशी मुंबईने भयानक जलप्रलय अनुभवला होता ह्याला कारण होते ते मिठी नदी . मिठी नदी पात्र व परिसरातील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणे हि 18 किमी.मिठी नदीच्या पुराला आमंत्रण ठरली होती.त्या दिवशी साधारण 2 वाजल्यापासून पावसाने रौद्ररूप धारण केले होते 12 तासांत 944.मामी. पावसाची नोंद झाली होती. त्या दिवशी कोणाला काही समजले नाही परंतु दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तांडव शांत झाले तेव्हा समजले कि1094 लोकांना जलसमाधी मिळाली होती. पाण्याची पातळी येवढी वर गेली होती कि असहायपणे जीवमुठीत घेऊन जिथे जागा मिळेल तिथे अन्नपाण्याविना स्तब्ध होते. ज्यानी धाडस करून पाण्यातून पुढे गेले ते दूषित पाण्याने कष्टाने, मानसिकदृष्टया खचल्याने मृत्युमुखी पडले. किती जाणाचे संसार पाण्यात वाहून गेले,किती घरे बुडाली जगाची आर्थिक राजधानी असलेल्या ह्या मुंबईचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान जलकहराने केले होते.
तो दिवस होता 26 जुलै 2005 मी माझ्या कार्यालयात विक्रोळीत ड्युटीवर वर होतो सकाळपासून पाऊस होता थांबत नव्हता लोकांचे येणें जाणे चालू होते संध्याकाळची वेळ जवळ येत होती पाऊस जास्त वाढत होता एव्हाना 5 वाजून गेले आमच्या कार्यालयाचे मुख्यअधिकारी दूर रहात होते म्हणून ते घरी जाण्यासाठी तातडींने गाडीत बसले कोणी बरोबर असावा म्हणून साहेबांनी गाडी थांबवून मला गाडीत बसविले गाडी एलबीएस रोड वरून श्रेयस कडे डावीकडे वळून पुढे जाणार होती गाडी आस्ते आस्ते आताच्या आरसिटी माँलच्या समोर प्रेसिडेंटिअल टॉवर च्या गेटवर सावकाश होत थांबली पुढे जाम ट्राफिक होते थोडा आधारही होता त्यामुळे काही दिसत नव्हते वाटले थोड्या वेळात गाड्या पुढे सरकतीलआणि आम्ही पुढे जाऊ असा विचार करता करता आठ वाजले ,दहा वाजले पावसाचा कहर वाढत चालला होता अंधारही वाढला होता कोठेही संपर्क होत नव्हता वाटले आपण ऑफिस पासून दोन किमी च्या आत मध्ये आहोत गाडी वळवून मागे जावे पण ते शक्य नव्हते कारण आमच्या मागे आणिरस्त्याच्या दुतर्फा शेकडो गाडया पुढे जाण्याच्या तयारीत होत्या पण कोणीही ना पुढे ना मागे जाऊ शकत नव्हते शिवाय 200 मीटरच्या आपल्या पुढे आणि मागे किती पाणी भरले हो कोणाला माहित नव्हते कारण हा भाग थोडा उंच आणि पाणी न साठणार असा होता जस जशी वेळ वाढत जात होती तस तसे काहीतरी ह्या पावसाने मोठा कहर केल्याचे लक्षात येत होते बाहेरील संपूर्ण वाहतूक बस, गाड्या, रिक्शा, टॅक्शी आणि ट्रेन बंद झाल्या होत्या पूर्वसूचना नसल्यामुळे कोणीही वेळेपूर्वी मुंबईकर आपल्या घरी निघाले नव्हते त्यात ऑफिस मध्ये काम करणाऱ्या महिला, वयस्कर मंडळी यांचे मोठे हाल झालेत सर्व वाहतूक बंद झाल्यामुळे महिलांनी आणि इतरांनी ट्रेन च्या पटरी आणि रस्त्यावरून चालत आपले घर गाठण्याचा प्रयत्न केला आम्ही गाडीत बसून होतो समोरून चिंतेत ,मुलांच्या ,घराच्या ओढीने धीराने चालणाऱ्या महिला झपाझप पावले टाकून पुढे जाताना दिसत होत्या सर्व स्तब्धपणे,चिंतेत चालले होते असे पूर्वी कधीच काही झाले नव्हते बाहेर काय चालले हे समजत नव्हते रात्रिबरोबर भूक वाढत होती अंगावर पाण्याचा लोळ होता परंतु पिण्यास पाणी नव्हते सर्वांची सारखी अवस्था होती रात्र सरून पहाट सुरु झाली तरी काही हालचाल नव्हती घर आणि कार्यालय जवळ असूनही मोठी अवघड परिस्थिती होती शेवटी पहाटे पाच च्या नंतर कार्यालयातून माणसे बोलवून बंद पडलेली गाडी परत फिरवून आशाउषा कंपिनीचच्या समोरून अर्ध्या कामरेईतक्या पाण्यातून ढकलत ऑफिस मध्ये आलो तेव्हा बाहेर काय झाले असेल याचा अंदाज आला आणि त्यानंतर विक्रोळी डेपोच्या मागून दुसऱ्याच्या आधाराने सकाळी आठ नंतर घरी घाटकोपरला पोहचलो त्या नंतरच्या मटा तसे टीव्ही वरील बातम्या वरून समजले कि मुंबईत जलप्रलय झाला होता जलप्रलय एवढा पाऊस नव्हता परंतु अफाट असलेल्या मिठी नदीचे मुंबईकरांनी नाला बनविला होता त्यामुळे पाणी विसर्ग झाला नाही पाणी ठिकठिकाणी तुंबले आणि त्यानेच मुंबईचा घात केला निसर्गा मध्ये आपण ढवळाढवळ केली खाडी किनार्यावरील मंग्रोव्हची तिवरांची झुडपे कत्तल केली त्याची किंमत मोजावी लागली.
प्रकाश कदम. घाटकोपर मुंबई 86.
निसर्ग छायाचित्रकार / पर्यावरण अभ्यासक.
प्रभारी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नेफडो
Comments
Post a Comment