२२ जुलैपासून लॉकडाऊन उठणार; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश 


       

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लॉकडाऊन हटविण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला यश आले आहे.  
      पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जाहिर केलेला लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका जाहीर केली होती.  त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेनी क्लस्टर कंटेन्मेंट झोन व कंटेन्मेंट झोन वगळून  महापालिका हद्दीतील इतर ठिकाणी असलेला लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दिनांक २२ जुलै सकाळी ०५ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून सम-विषम तारखेला 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत दुकाने अटीशर्थींवर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
            आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, जनतेच्या भावना व्यक्त तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला होता.  त्यांनी निवेदनातून म्हंटले होते कि, पनवेल महानगरपालिका हद्दीत सुरुवातीच्या काळात केंद्र शासनाने जाहिर केलेला व महाराष्ट्र शासनाने वाढवलेला असा लॉकडाऊन हा २४ मार्च ते ३१ मे पर्यत सुरू राहिला. काही प्रमाणात मे महिन्यात व नंतर जून महिन्यात सर्वसामान्य नागरिक, उद्योग, व्यवसाय व व्यापार यांची गाडी रूळावर येते ना येते तोच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या नावाखाली ३ जुलै पासून पुन्हा लॉकडाऊन जाहिर केला. मुळातच लॉकडाऊन हे कोरोनाचे संक्रमण थांबण्यावरचा उपचार नाही, हे विविध क्षेत्रातील अनेक तज्ञांनी वारंवार बोलून दाखवले आहे . नागरिकांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे (हात साबणाणे वारंवार स्वच्छ धुणे) व एकमेकांपासून किमान ३ फुटांचे शारिरिक अंतर पाळणे या सवयी लावून घेणे अभिप्रेत होते. मात्र सुरूवातीच्या काळात महाराष्ट्र सरकारकडून पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेमध्ये दैनंदिन कामासाठी मुंबईमध्ये जाणाऱ्या लोकांपासून त्यांच्या परिवारांना होणारे कोरोनाचे संक्रमण थांबण्यात अपयश आल्यामुळे पनवेलमधील कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे मात्र एकीकडे मुंबईमध्ये रूग्णांची संख्या रोज वाढत असताना संपूर्ण जुलै महिन्यात तिथे लॉकडाऊन नाही, मात्र पनवेल महापालिकासारख्या क्षेत्रात लॉकडाऊन लागू केला. सदर लॉकडाऊनच्या कालावधीत सातत्याने वाढ करून महानगरपालिका सर्वसामान्य नागरिकांचा, उद्योजकांचा, व्यापाऱ्यांचा अंत पाहत आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तु कशा पद्धतीने मिळवाव्यात असा प्रश्न पडत आहे . दुकान उघडल्याशिवाय ज्यांचा व्यवसाय होवू शकत नाही असे दुकानदार तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा पुरवणाऱ्या संस्था याठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या रोजगारावरती या लॉकडाऊनचा अनिष्ट परिणाम जाणवू लागला. तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत १५० ते २०० च्या घरात वाढणारी रोजची रूग्ण संख्या पाहता या रूग्ण संख्येला आवश्यक असणारे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्याची महापालिका अधिकाऱ्यांची धडपड ही अपुरी पडते आहे, अशा शब्दात प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती.          या परिस्थितीमध्ये रूग्णांसाठी जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आणि रूग्णांच्या संपर्कात आलेल्या तसेच संभाव्य रूग्णांची स्वॅब टेस्ट तसेच रॅपिड अँटीबॉडी टेस्ट जास्तीत जास्त प्रमाणात वाढवणे याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. तसेच ज्या उद्योग, अस्थापनांना आपले काम चालू ठेवायचे आहे, त्यांनी आपल्या उद्योगातील कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे व त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचाराचा खर्च उचलणे हे बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे. मात्र केवळ लॉकडाऊन करून महापालिका या सर्वापासून सुटका करून घेऊ इच्छिते. याचा पनवेल परिसरातील नागरिकांमार्फत व पनवेल शहरातील विविध घटकामार्फत निषेध केला जात आहे. जनसामान्यांचा विचार करून महानगरपालिका हद्दीतील लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अन्यथा भारतीय जनता पार्टीला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात जाहीर केले होते. त्यानंतर महानगरपालिकेच्यावतीने काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता. पण त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत नव्हता, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची आक्रमक भूमिका कायम होती. अखेर आयुक्तांनी २२ जुलै पासून लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे पण पूर्णपणे लॉकडाऊन उठत नाही आणि जनजीवन पूर्ववत होत नाही तो पर्यंत समाधानी नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन उठल्यानंतर नागरिकांनी संपर्क वाढणार याची काळजी घेण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावे, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे
 

 



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर