श्रीवर्धन चक्री वादळग्रस्त भागात कुणबी समाज बांधवाचा मदतीचा हात.
सोपान निंबरे; श्रीवर्धन.
देशासोबत महाराष्ट्रात कोरोना महामारी चालू असताना अनेक जण बेरोजगार झाले असून चाकरमानी गावी परत आले आहेत. अत्यंत बिकट परीस्थिती निर्माण झाली असतांना अशातच ३जून रोजी कधीं झाले न्हवते असे निसर्ग चक्रीवादळाचे कोकण किनार पट्टी वर वादळ धडकले.जोराचा वारा मुसळधार पाऊस काय होतंय बाहेर ते घरातून बघण्याचंही हिम्मत कोनातच नव्हती. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन घरात बसला होता तर वरून छप्पर उडून जाईत होते. पावसाच्या चार महिणे पुरेल इतके खाण्यापिण्याच्या जीवनावश्यक वस्तू मसाले, पीठ, तांदूळ, पापड अशा सगळ्या वस्तूंची नासधूस झाली. आता खायच काय पावसाळा काडायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला. शासनाची मदत खेडोपाडी पोचत नाही. अस असतांना कुणबी समाजाचे समाज सेवक जनतेविषयी आपुलकी प्रेम असणारे त्यांच्या विषयी बोलू तेवढं थोडं आहे. हरेश्वर शिवाजी नगर गावचे श्री. संतोषजी पाडावे यांनी स्वतः आपल्या विभागातील समाजबांधवाना मदतीचा हात देऊन सहकार्य केले आहे. ज्यांच्या घरावरील छप्पर उडाले अशा लोकांना प्लास्टिक पुरवठा करून राहण्याकरिता व्यवस्था केली. बाणगंगा, वावेलवाडी, सावरवाडी, काटकवाडी, कातकरवाडी, गडबवाडी, मारळ, कुरवडे, साक्षभैरी,भेंडखोल, मोहितेवाडी , कारिवणे अश्या अनेक वाडीपर्यंत प्लास्टिक, मेणबत्ती, सेनीटायझर , माचीस, मच्चरअगरबत्ती, छत्री, अन्नधान्य किट असे साहित्य वाटप केले. या थोर समाज सेवकाचा नागरिकांकडून कवतुक होत असून नागरिकांकडून त्यांना शुभेच्या देण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment