चिपळे ग्रुप ग्राम पंचायतीची कोरोनाला आमंत्रण




 


 

पनवेल/वार्ताहर

पनवेल तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या चिपळे ग्रुप ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये वेळीच घनकचरा उचला जात नसल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

   चिपळे ग्रुप ग्राम पंचायत हद्दीतील मौजे कोप्रोली येथील क्वालिटस गार्डन को ऑपरेटिव्ह हौसिंग या २३२ मध्यमवर्गीय सदनिकाधारकांचा या सोसायटीतच कचऱ्याचा ढीग गेल्या पंधरा दिवसांपासून कुजलेल्या अवस्थेत पडला आहे.ग्रामपंचायती कडे सोसायटीतील लोकांनी वारंवार विनंती करून ही ग्रामपंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत सोसायटीतील नागरिकांनी आपल्या कचऱ्याची स्वतःच विल्हेवाट लावावी असे अजब लेखी पत्राने उत्तर दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक बाहेर पडण्यास धजावत नाही तर आता कचरा टाकण्यासाठी कुठे जायचे?असा यक्षप्रश्न सोसायटीतील नागरिकांना पडला आहे.

  एकीकडे कोरोनाची भिती त्याच बरोबर कचऱ्याची दुर्गंधी अश्या परिस्थितीत येथील नागरिक जीवन जगत आहेत.या घाणीमुळे तसेच त्यापासून सुटलेल्या दुर्गंधीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.उद्या या घाणीमुळे सोसायटीतील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाल्यास चिपळे ग्रुप ग्रामपंचायत त्यास जबाबदार राहील काय?असा सवाल सोसायटीतील नागरिकांना पडला आहे.


 

 



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर