उपजिल्हा रुग्णालयाच्या  विरोधात नागरिकांत उद्रेक, तहसीलदार गोसावी यांच्या कडे निवेदन सुपूर्त, उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करण्याची मागणी 




 

 

श्रीवर्धन प्रतिनिधी -  सोपान निंबरे - उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया व इतर सेवा सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात व रुग्णालयात रुग्णांवर उपचार देण्यास नकार देण्याऱ्या डॉक्टर विरोधी कारवाई करण्यात यावी या मागणी साठी श्रीवर्धन मधील कृष्णा रटाटे,  मनोज गोगटे, सुनील पवार, जुनेद दुस्ते,   शोहेब हंमदुल्ले, प्रीतम श्रीवर्धनकर यांनी तहसीलदार सचिन गोसावी यांच्या कडे निवेदन सादर केले आहे . सदरच्या निवेदनात रुग्णालयाच्या विविध त्रुटी  व सोई सुविधा संदर्भात  मागणी करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया दिनांक  5 जुलै 2020 पासून बंद आहेत .  उपजिल्हा रुग्णालयातील  डॉक्टर  प्रसूती शस्त्रक्रिया  श्रीवर्धन ला होऊ  होत नाही  त्यामुळे तुम्ही  प्रसूती शस्त्रक्रिये साठी अलिबाग  किंवा महाड ला घेऊन जा असे सरळ सरळ उत्तर दिले जात आहे . श्रीवर्धन ते महाड  किंवा  अलिबाग  हे अंतर जास्त आहे. त्यामुळे संबधित ठिकाणी पोहचण्यासाठी खूप वेळ जात आहे.  शिवाय त्या  ठिकाणच्या सरकारी दवाखान्यात उपचार मिळण्याची शक्यता कमी आहे . पर्यायाने  गर्भवती माता व तिच्या बाळाच्या जीवितास धोका निर्माण होत आहे . महाड व अलिबाग येथील खाजगी दवाखान्यात   वैदयकिय शुल्क भरमसाठ घेतले जात आहे त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे . खासदार सुनीलजी  तटकरें  यांच्या प्रयत्नामुळे उपजिल्हा रुग्णालयाची भव्य वास्तू बांधण्यात आली आहे.   मात्र उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या कामचुकार भूमिके मुळे  श्रीवर्धन मधील सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर ची बाब निंदनीय आहे . सद्यस्थितीत कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. जनतेला वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे आहे . मात्र संबधित उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना योग्य  सेवा  सुविधा उपलब्ध होत नाहीत . एक वैद्यकीय अधिकारी  रजेवर असल्यास  प्रभारी पदभार संभाळणाऱ्या   अधिकाऱ्यांने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे मात्र संबधित   अधिकारी  व कर्मचाऱ्यास आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला दिसून येत आहे. असे निवेदनात म्हटले आहे. तसेच  सदर बाबीचा श्रीवर्धन म्हसळा मधील आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होत आहे. 5जुलै 2020 पासून उपजिल्हा रुग्णालयात किती रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे  प्रसूती शस्त्रक्रियेसाठी किती रुग्णांना महाड  व अलिबाग येथे पाठवण्यात आले आहे .? याची चौकशी करण्यात यावी व दोषी आढळ्यास संबधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी .  श्रीवर्धन  व म्हसळा या दोन्ही तालुक्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. उपजिल्हा रुग्णालय या नावा प्रमाणे किमान  श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील रुग्णांना तरी चांगली सेवा दिली जावी . 

  श्रीवर्धन  मध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढल्या पासून अनेक खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवल्याचे दिसून येत आहे. तरी संबधित डॉक्टरांचे  वैद्यकीय परवाने रद्द करण्याची शिफारस  आपण वरिष्ठ कार्यालया मार्फत आरोग्य  मंत्र्या कडे  करावी ही विनंती . तसेच जनतेवर  आलेल्या कठीण प्रसंगी सेवा बजावणाऱ्या देवतुल्य वंदनीय डॉक्टरांच्या पुढे आम्ही नतमस्तक होत आहोत. 

जनतेला तिचा  आरोग्य विषय हक्क मिळावा व दोषी व्यक्तीवर तात्काळ कारवाई केली जावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  

कोरोना काळात सेवा बंद ठेवणाऱ्या हॉस्पिटल वरती तात्काळ कारवाई करावी. व त्यांचं व्यावसायिक परवाने रद्द करावेत... प्रीतम श्रीवर्धनकर (नगरसेवक श्रीवर्धन  ) उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर अभावी गर्भवती महिलांचे हाल होत आहेत. ही बाब अतिशय गँभीर आहे त्याची तात्काळ नोंद घेण्यात यावी  अन्यथा जनतेचा उद्रेक होईल त्यास हॉस्पिटल प्रशासन जबाबदार राहील .... जुनेद दुस्ते ( मुघल  मोहल्ला  श्रीवर्धन )  माझ्या मुलीला झालेला त्रास अन्य माता भगिनींना  होऊ नये या  साठी मी हॉस्पिटल च्या मनमानी कारभारा विरोधात आरोग्य मंत्र्याला निवेदन दिले आहे.... कृष्णा रटाटे (रहिवाशी  धोंड गल्ली श्रीवर्धन ) श्रीवर्धन मधील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे . आज नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयातून  योग्य सुविधा दिल्या जात नाहीत ही बाब निंदनीय आहे. गर्भवती महिलांचे अतोनात हाल होत आहे... मनोज गोगटे  ( गणेश आळी  श्रीवर्धन )  कृष्णा रटाटे च्या दोन्ही मुली विषयी उपजिल्हा रुग्णालयात चुकीची कृती करण्यात आल्या आहेत. सदरची बाब गँभीर आहे.... सुनील पवार (धोंड गल्लीश्रीवर्धन  )  उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर च्या रिक्त पदा विषयी  वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे. त्या नुसार  लवकरच  रिक्त पडे भरली जातील . श्रीवर्धन मधील जनतेला दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे... जितेंद्र सातनाक  ( नगराध्यक्ष श्रीवर्धन )



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर