एक डॉक्टर, प्रत्येक वयाच्या मुलासाठी


भारत बालाजी जाधव

 

सध्या सर्वत्र कोरोना रोगाने थैमान घातले आहे. निसर्गरम्य कोकणातील श्रीवर्धन गाव हे काही त्याला अपवाद नाही. श्रीवर्धन तसेच त्याच्या आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. चाकरमानी गावात परत आल्यामुळे ह्या प्रकारात अजूनच वाढ झाली आहे. गावातील सर्व डॉक्टर्स कोणतेही आधुनिक सुविधा उपलब्ध नसताना त्यांच्या जिवाची बाजी लावून सर्व पेशंटना तपासत आहेत. परंतु दुदैर्व म्हणजे त्यापैकी अनेक डॉक्टर्स स्वतः कोरोनाला बळी पडले आहेत. त्यामुळे सध्या गावात डॉक्टरची टंचाई निर्माण झाली आहे. 

 

पण अशातच गावातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. महेंद्र भरणे (Child Specialist),  हे गावकऱ्यांच्या मदतीला धावून पुढे आले आहेत. येणाऱ्या प्रत्येक पेशंटला ते स्वतः तपासात आहेत. तसेच त्यांच्या परीने शक्य तितके उपचार कोणतीही तक्रार न करता ते करत आहेत. आपल्या गावात अत्याधुनिक उपकरण तर दूर पण आधुनिक औषध सुध्दा वेळेवर मिळणार नाहीत, पेशंटचे रिपोर्ट्स शहरातून येण्यास वेळ लागेल, पेशंटला शहरात हलविण्याची आर्थिक सोय नाही,  हे ठाऊक असून पण डॉ. भरणे त्यांच्या प्रयत्नांची शिकस्त लावत आहेत. 

 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक डॉक्टर्स, पैथेलोजिस्ट, तसेच अन्य मेडिकल- पैरामेडिकल स्टाफ लढवय्ये बनून जंग लढत आहेत. पण काही अपवाद मात्र परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हंगामी पिके घेत आहेत. माणुसकीला लाजवेल असे अनेक प्रकार भारतात घडतात, हे क्षेत्र सुध्दा त्याला अपवाद नाही. पण डॉ. भरणे हे कोविड पेशंटना तपासत आहेत व उपचार देत आहेत. मेडिकल उपचारा सोबतच ते सर्वांना हसवून त्यांचं मनोबल स्थिर करत आहेत. आजवर अनेकदा त्यांच्यावर child specialist असून देखील मोठ्यांवर प्राथमिक उपचार करण्याबाबत टीका झाली.  तेंव्हा कोणीही त्यांची बाजू, ज्ञान समजून न घेता त्यांची माप काढण्यात धन्यता मानली. अश्या अनेकांना डॉक्टरांनी आज काहीही न बोलता उत्तर दिले आहे. कोणीही उलटसुलट काहीही बोलले तरी सर्वांकडे हसत हसत दुर्लक्ष करणे व पुढे चालत राहणे हा डॉक्टरांचा जणू स्वभावच. मुळातच त्यांना व्यायामाची प्रचंड आवड. नियमित मॉर्निंग वॉक, न चुकता प्राणायाम, नेमका मोजका आहार, निर्व्यसनी असल्यामुळे कोरोनवर नियंत्रण ठेवणे डॉक्टरांना फारसे कठीण गेले नाही. पेशंटला ते ज्या टिप्स देतात ते त्या स्वतःच्या दिनचर्येत अमलंबावतात.

 

अश्या या खऱ्या अर्थाने 'गरिबांच्या डॉक्टर' असलेल्या डॉ. भरणे यांचं कौतुक करावं तितकं थोडाच आहे. माणूस बाह्यरुपाने कितीही वाढला तरी अंतरमुखात लहान मुलचं असतो. त्यांच्यासाठी मग हा child specialist च योग्य नाही का? शेवटी एकच सांगावस वाटत, कोरोनाच संकट लवकर दूर होवो पण गरज तेवढी सरो, वैद्य उरो..

 

डॉ. भरणे तुमच्यातल्या कोविड योद्ध्याला आणि तुमच्या रुग्णसेवेला सलाम

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर