प्रदेश भाजपची कार्यकारिणी जाहीर लोकनेते रामशेठ ठाकूर प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी
पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. या कार्यकारणीत १२ प्रदेश उपाध्यक्ष, ०५ महामंत्री, ०१ कोषाध्यक्ष, प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्य, कार्यसमिती सदस्य, निमंत्रित सदस्य, मोर्चा, प्रकोष्ट, मिडिया, सोशल मिडिया, आदी समितीचा समावेश आहे.
राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल अस मत यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी राम शिंदे, जयकुमार रावळ, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हलवणकर, प्रीतम मुंडे, प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, जयप्रकाश ठाकूर, महामंत्री म्हणून सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, संघटन महामंत्री म्हणून विजय पुराणिक, कोषाध्यक्षपदी मिहीर कोटेचा, तर प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे पाटील, किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर, हरिभाऊ बागडे, उदयनराजे भोसले, गिरीश बापट, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, नारायण राणे, लोकनेते रामशेठ ठाकूर, गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, आशिष शेलार, संभाजी पाटील-निलंगेकर, योगेश सागर आदी एकूण ५८ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर निमंत्रित सदस्य म्हणून जगन्नाथ पाटील, सुरेश हावरे, मधू चव्हाण, निलेश राणे, पाशा पटेल, बाळासाहेब पाटील, राजेंद्र मिरगणे, संजीव नाईक, लक्ष्मणराव ढोबळे, अशी एकूण १३९ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षपदी उमाताई खापरे, प्रदेश युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी विक्रांत पाटील, अनुसूचित जाती प्रदेशाध्यक्षपदी सुधाकर भालेराव, अनुसूचित जमाती अध्यक्षपदी डॉ. अशोक उईके, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी हाजी. मो. एजाज देशमुख, किसान मोर्चा अध्यक्षपदी अनिल बॉंडे, इतर मागासवर्गीय जाती (ओबीसी) अध्यक्षपदी योगेश टिळेकर यांची तसेच प्रदेश कार्यसमितीच्या सदस्यपदी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment