पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांसाठी  सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान १००० बेडचे सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून द्या 


 

 

- आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी  

 

 

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान १००० बेडचे सुसज्ज रूग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

            या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री महोदयांना निवेदनही दिले आहे. आ. ठाकूर यांनी केलेल्या मागणीत म्हंटले आहे कि, पनवेल, उरण तसेच नवी मुंबई मधील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोमार्फत निरनिराळ्या प्रकल्पासाठी अगदी तुटपुंज्या दरात संपादीत केलेल्या असून त्याबदल्यात सिडकोला प्रचंड फायदा झाला आहे. सद्यस्थितीत सिडकोचे पनवेल व उरण तालुक्यामध्ये मोठी गुंतवणूक असलेले विकास प्रकल्प सुरू आहेत . ज्या पनवेल व उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवरील प्रकल्पांवर सिडको नावारूपाला आली त्या दोन्ही तालुक्याच्या हद्दीतील कोरोना रूग्णांना आरोग्य सेवा पुरवणे सिडकोचे प्रथम कर्तव्य आहे.  ज्याप्रमाणे मुलुंड येथे सिडकोने १२०० बेडचे कोविड रूग्णालय उभारले आहे. त्याच धर्तीवरती पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना रूग्णांसाठी किमान १००० बेडचे कोविड रूग्णालय तातडीने उभे करणे गरजेचे आहे. याखेरीज पनवेल व उरण तालुक्यातील मोठया क्षमतेच्या हॉस्पीटलांना आवश्यक ते वैद्यकिय साहित्य पुरविण्यास सिडकोने पुढाकार घेतल्यास अशा हॉस्पीटलबरोबर करार करून सिडको अथवा शासन नागरिकांना विनामुल्य अथवा कमीतकमी दरात कोरोना वर उपचारावर मदत मिळवून देवू शकते, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

          पनवेल, उरण तालुक्यातील तसेच रायगड जिल्हयातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पहाता सिडकोने तातडीने पावले न उचलल्यास या साप्तज्ञ वागणूकीच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण होवू शकतो. तरी सदर बाबतीत तातडीने पावले उचलावीत व पनवेल व उरण तालुक्यातील जनतेला सिडको मार्फत सदर सुविधा तातडीने निर्माण करून द्यावी, अशी महत्वपूर्ण मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील निवेदनाची प्रत महितीस्तव रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनाही देण्यात आली आहे

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर