इनामपुरी येथील अनधिकृत टॉवर अखेर जमीनदोस्त  पालिका आयुक्तांनी दाखविली कर्तबगारी 


 

चुकीच्या कामांना पाठीशी घालणार नसल्याचा आयुक्तांचा निर्वाळा 

टॉवरवर कारवाई झाली पण बेकायदेशीर झाडांची कत्तल राहिली 

विनापरवाना टॉवर माफियांना पालिकेचा मिळाला दणका 

 

पनवेल : राज भंडारी 

 

पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर येथील इनामपुरी गावातील अनधिकृत मोबाईल टॉवर बांधकाम अखेर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी उशिरा का होईना पण पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी आपली कर्तबगारी दाखवीत हे अनधिकृत टॉवर बांधकाम हटविण्यासाठी आदेश दिले त्यामुळे नागरिकांच्या मनात आयुक्ताबाबत असलेले गैरसमज काही अंशी कमी झाले असल्याचे समोर आले आहेत. 

 

इनामपुरी गावातील म्हात्रे यांच्या जागेत उभा करण्यात आलेले मोबाईल टॉवरचे बांधकाम हे त्यांच्याच जागेत उभे आहे किंवा हाय टेन्शन वायरच्या उभारणीमध्ये ती जागा या विद्युत वितरण कंपनीची आहे, याचा तपास करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. सदर मोबाईल टॉवर उभारणारे माफिया हे शासनाच्या डोळ्यात धूळ फेकूनच टॉवर उभारणीचे काम करित आहेत का ? असा सवालही यामुळे समोर आला आहे. आज पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून जरी टॉवरचे बांधकाम तोडण्यात आले असले तरी याठिकाणी झाडांची झालेली कत्तल मात्र पाठीशी घालण्यात आली आहे. एका बाजूला पालिकेची ही कारवाई टॉवर माफियांना मोठा दणका देणारी मानली जात आहे. यावेळी पालिका आयुक्तांनी कोरोना रोगाचा प्रसार थांबविण्यासह अनधिकृत बांधकामांना थारा दिला नसल्यामुळे चुकीच्या कामांना पाठीशी घालणार नसल्याचा निर्वाळा जणू त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे. 

 

दिनांक 21 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत टॉवरबाबत आपली कागदपत्र सादर करण्याची मुभा पालिकेमार्फत देण्यात आली होती. मात्र संबंधित टॉवर उभारणाऱ्या अधिकाऱ्यांना आपली कागदपत्रे सादर करता न आल्यामुळे पालिका आयुक्तांनी अखेर आपल्या आदेशात संबंधित अनधिकृत टॉवर नेस्तनाबूत करण्याचे आदेश पारित करून जनतेच्या कलुशीत झालेल्या मनामध्ये आशेचा नवा किरण पालिका आयुक्तांनी आणला. अखेर नागरिकांच्या सतर्कतेमुळे भविष्यातील घडणारी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी मदत झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनीही पालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले. 

 

 

 


नागरिकांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज...मानसोपचार तज्ञ समिधा साठे

 

पनवेल : वार्ताहर 

 

नवी मुंबई:कोरोना महामारी असो की इतर कोणताही साथीचे आजार!या कालावधीत नागरिकांना मिळणारे सल्ले तंतोतंत पळाले गेले. तर आपण त्यावर सहज मात करू.पण आपले नागरिक अश्या मार्गदर्शनाला पायदळी तुडवून आपल्या मनाप्रमाणे वागत असल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते.त्यामुळे नागरिकांनी आपली मानसिकता बदलली तर कोरोना सारख्या वैश्विक महामारीवर सहज मात करू शकतो असे मत मानोसपचार तज्ञ समिधा साठे यांनी व्यक्त केले आहे.

 

महाराष्ट्रात नाहीतर पूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.शासनाकडून आरोग्य सेवेसाठी खूपसे प्रयत्न केले जातात. पण ते तोकडे पडत आहेत. कोव्हिडं रुग्णालये सुरू केली आहेंत. पण मनुष्यबळ कमी पडत असल्याने रूग्णाना सेवा देण्यास अडचणी येत आहेत.अश्या परिस्थिति मध्ये नागरिकांनी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या प.पु.वामनराव पै यांच्या तत्वा प्रमाणे जगण्याची गरज भासू लागली आहे असेही पुढे मानोसपचार तज्ञ समिधा साठे म्हणाल्या.

 

मार्च महिन्यापासून आपल्या देशात कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली.तेव्हापासून केंद्र,राज्य,मनपा,जिल्हाधिकारी कार्यालय आदी कडून विविध टाळेबंदी,प्रतिबंध क्षेत्र घोषित केली.आता विविध मनपा क्षेत्रात लॉकडाऊन,होस्टस्पॉट झोन मध्ये लोकडाऊन प्रक्रिया चालू आहे.तरीसुद्धा  कोरोनावर मात करण्यास अपेक्षित असे यश येत नाही.याला कारण म्हणजे झाल्यावर बघू,काय होतंय?ही नागरिकांची मानसिकता असल्याचेही मानोसपचार तज्ञ साठे यांनी संगीतले.

 

 

कोट

शहारत फक्त लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिली की नागरिक कोणत्याही सल्ल्याचा विचार न करता रस्त्यावर येतात.दुकाने,डी मार्ट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते.त्याचवेळी सामाजिक अंतराचे भान ही त्यांना राहत नाही.ही मनोवृत्ती चुकीची आहे.ही बदलण्याची गरज आहे.

- समिधा साठे,मानसोपचार तज्ञ, रायगड


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर