५० हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट किट खरेदी करण्याची विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी  पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी २४ जुलै पर्यत लॉकडाउन वाढविण्यात आले असून, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ५० हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट किट खरेदी करण्याची मागणी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.  


          पनवेल महापालिका हद्दीत कोरोना चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ते प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे वारंवार प्रयत्न करत आहेत अशा सूचना ते पालिकेला करताना दिसून येत आहेत . तसेच  पनवेल पालिका , आयुक्त,  मंत्री महोदय  यांच्याकडे देखील वारंवार मागण्या करत आहेत. पनवेल पालिका हद्दीत वाढत्या कोरोना मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना देखील याची बाधा होत आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीसाठी अँटीजेन टेस्ट करण्यास 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'ने परवानगी दिली आहे. बृहन्मुंबई व पुणे महानगरपालिकेने १ लाख रॅपिड अँटीजेन टेस्ट किटची खरेदी केलेली आहे. त्याच धर्तीवर पनवेल महानगरपालिकेने किमान ५० हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट किटची खरेदी करावी. कंटेंटमेंट झोन मधील नागरिकांची स्क्रीनिंंग करून संशयितांचे या रॅपिड टेस्ट किटच्या माध्यमातुन चाचणी करण्यात यावी. अशी आग्रही व महत्वाची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर