जागतिक वनसंवर्धन दिन 31 जुलै 2020 वने वाचवा जीवन जगवा - प्रकाश कदम
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असे आमच्या संतानी सांगून ठेवले आहे. आमच्या पूर्वजानी वड, पिंपळ, तुळस सहित सर्वच झाडांना महत्व दिलेले आहे. झाडांमुळे पाऊस पडतो पाणी मिळते ,सावली मिळते, बाष्प टिकून रहाते, ऑक्सिजन मिळतो, भूजल पातळी राखली जाते, तापमानात घट होते झाडांशिवाय निसर्ग नाही आणि निसर्गाशिवाय प्राणिजीवन नाही. जन्मानंतर व मृत्यूपर्यंत चालणारा श्वास हा आपल्या पृथ्वीतलावर वनस्पतीपासून मिळतो सर्वप्रणिमात्राना जीवन आवश्यक प्राणवायू हो झाडे आम्हाला देतात तर आम्हांस अपायकारक असणार CO2 कार्बनडाय ऑक्साइड हा विषारी वायू स्वताः शोषून घेउन सर्व प्राणिमात्रांवर हि वृक्ष संपत्ती दया करते आहे परंतु आमच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या वनदेवतेचा आम्ही सतत संहार करतो आहोत ते सुद्धा प्राथमिक गरजेपोटी नसून अधिकाअधिक लालसेपायी मानवजात जंगलांचा विध्वंस करत आहे.
21 वे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रगतशील युग म्हटले जात आहे. आधुनिक पद्धतीने मानवी बुद्धी व यंत्रांच्या सहाय्याने विकास आणि प्रगती साधण्यासाठी जगात चढाओढ आहे हे करत असताना वाढत्या गरजा, अन्न धान्य ,कारखाने, उत्पादने ह्यांची वाढत्या लोकसंख्येनुसार वाढती मागणी तशात अनाठायी विलासी गरजा ह्यासाठी निसर्गाला, वनसंपत्तीला नष्ट करून त्या ठिकाणी मानव आपले बस्तान बसवीत आहे .विकास गरजेचा आहे तशी वृक्षसंपदा त्यापेक्षा महत्वाची आहे . निवासी वस्त्या, नवीन कारखानदारी साठी अधिक जागेची पूर्तता वनसंपदा नष्ट करून तिथे माणूस फक्त आपले सुख, संपदा, वैभव स्वार्थ पहात आहे परंतु निसर्गावर घाला घालून आपण आपली चंगळ करताना निसर्गाच्या संतुलित जीवनचक्राला आपण कोठेतरी ब्रेक लावत आहोत हे लक्षात येत नाही .
जैविविधतेतील प्रत्येक पशु, पक्षी, प्राणी, जलचर, सुष्मजीव हे सर्वजण त्या चक्रातील सारखे घटक आहेत त्यातील एकाही घटकास इजा अथवा धोका पोहचला तरी हि चक्र सुरळीत गतीने चालणार नाही त्याचे दुष्परिणाम मानवांना भोगावे लागतील. मोठमोठ्या जंगलांना कधी कधी आगी लागतात किव्हा लावल्या जातात ? त्यामध्ये हजारो वर्षांची वनसंपदा औषधी वनस्पती, पशु,पक्षांचे आश्रयस्थान जैविविधता जळून खाक होते परत तिथे तशी जैविविधता निर्माण होण्यासाठी पंधरा वीस पिढ्या अर्थात पाचशे वर्षांचा कालावधी जावा लागतो.
आज अनेक योजनांसाठी वृक्षतोडीचे प्रमाण कमी झालेले नाही रस्ते, लोहमार्ग, नवीन खाणी, मेट्रो, विमानतळ शिवाय औधोगिक,रासायनिक प्रकल्पासाठी वृक्षतोड होते त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजे जेवढी झाडे तोडली तेवढी झाडे दुसऱ्या ठिकाणी लावू अशी आश्वासने दिली जातात ती पाळली जातात का ? त्यावर कोणत्यातरी संस्थेची देखरेख असते का ? हे सर्वच न समजणारे प्रश्न शेवटी शिल्लक राहातातच.
आज आपण केवळ सरकारी कायदे आहेत म्हणून गप्प बसून चालणार नाही आताच्या युवा पिढीने शाळा विद्यालयीन विद्यार्थ्यानी निसर्ग वनसंपदे विषयी जास्तीत जास्त सहानभूतीने क्रियाशील रहाणे गरजेचे आहे. झाडांची संख्या वाढविण्याकरिता शाळा, कॉलेजात श्रमदान माध्यमातून वनीकरण
मोहीम राबविताना वैयक्तिकपणे सुद्धा आपल्या जन्मदिनी, विवाह दिनी सामाजीक कार्य म्हणून जिथे जागा उपलब्ध असेल तिथे वृक्षारोपण केले पाहिजे हि काळाची गरज आहे. झाडे लावताना सहसा परदेशी शोभिवंत झाडे न लावता ती जास्त प्रमाणात देशी झाडे वड, पिंपळ, कडुलिंब, बोरआणि अनेक फळे आणि फुले देणारी झाडे लावा त्यामुळे सतत पक्षी ,कीटक, फुलपाखरे यांचा तिथे राबता राहील परागीकरण होऊन स्थानिक हवामानात ती झाडे जोमाने वाढतील साधारण जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून आपण प्रवास करताना सोबत फळांच्या बिया ठेउन रस्त्याच्या आजूबाजूला आणि इतरत्र फेकाव्यात किव्हा पुरून टाकाव्यात पाच वर्षात तो भाग हिरवागार दिसेल.
निसर्गावरील मानवी आघाताने आज जगात अनेक संकटे येउन गेली आहेत तर काही आवासून उभी आहेत त्सुनामी, ज्वालामुखी, प्रलय, दुष्काळ, भूकंप, भूस्खलन अनेक रोगांच्या साथी स्वाइनफ्लू ,बर्ड फ्लू आणि आता कोरोना व्हायरस निद्रिस्त अवस्थेतून बाहेर पडला आहे संपूर्ण जग भयभीत आहे ह्या पुढे अजून पुढे कोणती संकटे असतील त्याचा आपण विचार करू शकत नाही म्हणूनच ह्या भूतलावर माणसांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर वृक्षाचे अस्तित्व प्रथम टिकवून ठेवावे लागेल त्यांची प्राणप्रणाने जपणूक करावी लागेल .वृक्ष संपदा वाढली तर निसर्ग वाचेल.
प्रकाश कदम
उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,भारत
Comments
Post a Comment