रायगड मत' च्या बातमीची घेतली दखल, मदत निधी 2 दिवसात होणार Ac ला ट्रान्सफर 


 

म्हसळा (जितेंद्र नटे)

 

रायगड मत च्या बातमीची दखल घेत नुकसानग्रस्त मदत निधी वाटपाचा वेग वाढला आहे. तहसीलदार गोसावी साहेब, तसेच SBI बँक मॅनेजर आणि कर्मचारी यांचेशी बोलणे झाले आहे. पुढील 2-3 दिवसात सर्व लिस्ट पूर्ण होतील. अडचण अशी आहे कि Transfer करण्याचे काम फक्त Sbi बँकच करीत आहे. का? कारण शासन आदेश तसें आहेत. त्यामुळे एकच बँकवर प्रेशर आला आहे. खरे तर बँक ऑफ इंडिया चे AC जास्त आहेत. त्यामुळे म्हसळ्यातील सर्व बँकाना वाटप विभागून दिले पाहिजे होते मात्र तसें झाले नाही. त्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. Sbi मधील Ac चे पैसे ट्रान्सफर पण झाले. मात्र इतर बँकेचे AC ट्रान्सफर करताना SBIला NeFT करावे लागत आहे. सर्व मॅटर मराठीत असल्याने ही त्यांना अडचण येत आहेत. सॉफ्ट कॉपी म्हणजे एक्सेल फाईल मिळाली तर ते काम लवकर करू शकतात. म्हणून आता तहसील कार्यालय येथे संपर्क साधून सॉफ्ट कॉपी त्वरित द्यावी म्हणजे नावे आणि A/C कॉपी करून लवकरात लवकर ट्रांसफर करता येतील. अन्यथा सर्व 5 Colum भरून आणि नावाची, A/c No ची खात्री Manualy करावी लागत आहे. त्यामुळे उशीर लागत आहे, असे sbi चे नवले यांनी सांगितले आहे. Sbi चे Manger करकरे यांच्याशी बोललो असता "आम्ही प्रयत्न करीत असून दोन दिवसात आम्ही पैसे ट्रान्सफर करू असे सांगितले आहे. सद्या म्हसळा ब्रांच मधे नेटवर्क नाही म्हणून म्हसळ्या ब्रांचचा Staaf ते श्रीवर्धन ब्रांच मधून काम करीत आहेत. रात्री 12 वाजे पर्यंत Staaf काम करीत आहेत. एकाच बँकेलाला काम दिल्यामुळे हे सर्व उशीर होत आहे. असेही त्यांनी सांगितले. 'रायगड मत'च्या दणक्याने इथं पर्यंत आलोय. आता वाट पाहू या 2 दिवस. या प्रकरणी SBI चे सोहेल खेडेकर हे संपर्कात असून आपल्या स्थानिक लोकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. म्हसळ्याचे प्रथम नगराद्यक्ष श्री. दिलीप कांबळे हेही 'रायगड मत'शी संपर्कात असून तेही मदत निधी मिळवून देन्यासाठी प्रयत्न करीत आहेत. स्वतः बँकेशी संपर्क साधून पाठपुरावा करीत आहेत. देव करो सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळो आणि लवकरात लवकर मदत निधी मिळो.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर