दक्ष नागरिक संस्थेची महाराष्ट्राची प्रथम सभा संपन्न व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सभेचे आयोजन महाराष्ट्रातील एकूण 15 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग
प्रतिनिधी -
संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे सरकारने घेतलेल्या लॉकडाउन च्या या निर्णयाला दक्ष नागरिक संस्था (DNS) चे देशभरातील पदाधिकारी तसेच पत्रकार, महिला, चित्रपट, अल्पसंख्याक, क्रिडा, विभागातील सभासदांनी पाठिंबा दर्शवला असून सरकार ला भविष्यात जर मनुष्यबळाची गरज भासली तर संपूर्ण देशभरातून दक्ष नागरिक संस्थेचे पदाधिकारी तसेच सभासद निस्वार्थपणे मदतीला उभे राहतील असे दक्ष नागरिक संस्था (DNS) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांनी मार्गदर्शन करताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सांगितले आहे.
दक्ष नागरिक संस्था (DNS) ची महाराष्ट्र राज्याची पहिली सभा दिनांक २८ जून २०२० रोजी संपन्न झाली. लॉकडाउन मुळे बाहेर सभा घेण्यास शक्य नसल्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हि सभा घेण्यात आली.या सभेत दक्ष नागरिक संस्था (DNS) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकुर, राष्ट्रीय उपाध्यक्ष अफ्रोज सय्यद, राष्ट्रीय सल्लागार विंग कमांडर राजेंद्र महानुभाव,राष्ट्रीय सल्लागार प्रकाश राणे,महाराष्ट्र संपर्क प्रमुख नामदेव कोळी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शब्बीर कोठारी,राष्ट्रीय सहसचिव भारत भोपी, महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश भगत,राष्ट्रीय संघटक (अल्पसंख्याक विभाग) जमीर मुल्ला,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष (अल्पसंख्याक विभाग)अय्युब पठाण,राष्ट्रीय महासचिव (महिला विभाग) वंदना मोरे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष (महिला विभाग) निहालिका चव्हाण,राष्ट्रीय संपर्क प्रमुख (महिला विभाग) शशिकला सिंह, राष्ट्रीय कायदेविषयक सल्लागार (महिला विभाग) ऍड निहा राऊत,
राष्ट्रीय अध्यक्षा (महिला विभाग) रिजवना दीदी शेख,महाराष्ट्र प्रदेश संघटक (क्रिडा विभाग) - सुनीलराव बुधाना,पुणे जिल्हाध्यक्ष (अल्पसंख्याक विभाग) शाहनवाज सय्यद, महाराष्ट्र उपाध्यक्ष (महिला विभाग) मौसमी बिसेन,राष्ट्रीय महासचिव (अल्पसंख्याक विभाग)सिराज तांबोळी,महाराष्ट्र अध्यक्ष (पत्रकार विभाग) रुपाली वाघमारे,ठाणे जिल्हा अध्यक्ष (महिला विभाग)मेघा मोरे,राष्ट्रीय संघटक (चित्रपट विभाग) पदमनाभ राणे,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष (महिला विभाग) रत्नप्रभा गोमसे,महाराष्ट्र संघटक (अल्पसंख्याक विभाग) फिरोज आलम,महाराष्ट्र संघटक लक्ष्मण बागव,महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी जुबेर तांबोळी,
दक्ष नागरिक संस्था (DNS) माहिती व तंत्रज्ञान विभागाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख व सोबत इतर जिल्ह्याध्यक्ष उपस्थित होते.
या सभेत सामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू आदींच्या विकासासाठी तसेच सुरक्षेसाठी काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात मुख्यतः महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तसेच तालुक्यात कार्यकारिणी ची पद्धत कशी असावी, महिला पत्रकार विंग, सोशल मीडिया विंग, तसेच दक्ष नागरिक संस्था (DNS) च्या या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सभेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, सर्वसामान्य नागरिक, महिला, पत्रकार, खेळाडू, सांस्कृतिक विभाग व सिने सृष्टीतील कलाकारांच्या समस्या सोडविण्याचे आयोजन अश्या बऱ्याच विषयांवर चर्चा करण्यात आली. आपला दिवसागणिक सहभाग दिसावा म्हणुन प्रत्येक सभासदाला १ रुपये रोज असे वार्षिक ३६५ रुपये सभासद शुल्क आकारले जाईल तसेच दक्ष नागरिक संस्था (DNS) ची वेबसाईट लवकरच सुरु होणार असल्याचे दक्ष नागरिक संस्था (DNS)चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांनी या वेळेस जाहीर केले.
या सभेत मार्गदर्शन करतेवेळी डॉ. मुनीर तांबोळी यांनी मानव अधिकार जनजागृती साठी संपूर्ण भारतभर संस्थेचे कार्य सुरू करण्यात आले आहे तसेच महिला, विद्यार्थी यांच्या साठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.1 लाख सदस्य या मोहिमेत जोडण्याचा संकल्प असल्याचे डॉ.मुनीर तांबोळी यांनी सांगितले.
Comments
Post a Comment