न्यू इंग्लिश स्कुल नेवरुळ विध्यालयाला पद्वमश्री श्रीमती अनुराधा पौंडवाल यांच्या कडून मदतीचा हात.
म्हसळा प्रतिनिधी - ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्री वादळाने संपूर्ण महाराष्ट्रसह रायगड जिल्ह्याला झोडपले , विशेषतः श्रीवर्धन, म्हसळा भागात त्याचा जोर जास्त असल्याने गावच्या गावे बेचिराख करून सोडले त्यात लोकांची घरं , अनेक सार्वजनिक सुविधा उद्वास्थ झाल्या त्याच बरोबर ज्ञानाची मंदिरे म्हणजे शाळा सुद्धा संपूर्ण पणे भुईसपाट झाल्या त्यामुळे गावकऱ्यापुढे शाळा मुलांच्या पुढील शिक्षणाची आणि शाळा पुन्हा नव्याने उभी करण्याच्या समस्या होत्या.म्हणतात ना आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या उक्ती प्रमाणे हि समस्या पद्वमश्री, गायिका आदरणीय अनुराधा पौंडवाल यांच्या कानावर गेली आणि त्यांनी लगेच या शाळेला दातृत्व भावनेने मदत केली आज दि 19 जुलै रोजी शाळेला भेट देऊन पाहणी केली आणि लगेच 50000/-चा चेक सढळ हस्ते शाळेला मदत दिली आणि याही पुढे संगणक किंवा इतर शालेय साहित्यासाठी मदत देण्याचे आश्वासन दिले. आणि गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी बहुमोल मदत केली अशा दानशूर व्यक्तीमत्वास धन्यवाद.
हि मदत मिळवून देण्यासाठी श्री अक्षय महागावकर, संजय लटके त्याचप्रमाणे दानशूर व्यक्तीमत्व मा कृष्णाजी महाडिक साहेब यांच्या प्रयत्नाने हि मदत मिळाली सदर रकमेचा चेक स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष श्री रवींद्र जी लाड, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष श्री राजेंद्र लटके, पो पा मा निलेश लटके, ग्रा प सदस्य सुनीलजी दिवेकर, नंदकुमार महाडिक, तुषार रिकामे पांडुरंगजी खेडेकर, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी युवा नेते तथा सभापती कृषी व पशुसंवर्धन रायगड जिल्हा परिषद मा बबन दादा मनवे , श्री महेशजी घोले उपस्थित होते
Comments
Post a Comment