शैक्षणिक शुल्काबाबत धोरण ठरविण्यात यावे, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी


पनवेल : ऑनलाइन शालेय शिक्षण पद्धतीमध्ये शाळांकडून घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्काबाबत धोरण ठरविण्यात यावे अशी आग्रही मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


            प्रितम म्हात्रे यांनी दिलेल्या निवदनात म्हटले आहे की, प्रत्येक शाळेने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी संपूर्ण शुल्क जमा करण्याचे ठरविले आहे आणि ते ऑनलाईन वर्ग उपलब्ध करुन देतील. या प्रणाली व कार्यपद्धतीमुळे वीज बिल, मासिक ओव्हरहेड खर्च आणि इतर बचतीसह आवर्ती खर्च कमी होऊन शैक्षणिक संस्थांचा आर्थिक भार कमी होणार आहे. या कोरोना साथीच्या परिस्थितीत राज्यातील पालकांवर फी देण्याचे ओझे आहे आणि कोणत्याही शाळांनी शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतलेले माहितीत नाही. मुंबईतील कोरोनाच्या सद्यस्थितीनुसार काही महिने तरी यापुढे कोणतीही शाळा शालेय वर्ग सुरू करू शकणार नाही आणि राज्यातील पालकांना शालेय फी सक्तीने देण्यास त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या विषयावर लक्ष देऊन ऑनलाईन शाळा शुल्काबाबत आपले विशिष्ट धोरण ठरवून सर्व राज्यात लागू करावे. अशी विनंती करण्यात आली आहे. 


             सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आपल्या कुटुंबाचा गाडा चालवण्याच्या प्रयत्न करत आहे, यासाठी आघाडीचे सरकार सर्वतोपरी सहकार्य करत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन काय करावे, आपले वर्ग पुढे कसे घ्यावेत, ऑनलाईन वर्गांसाठी किती शुल्क आकारले जावे यासाठी मार्गदर्शन करावे. पालक वर्ग फी भरण्याच्या विरोधात नाही परंतु आपण वरील विषयात विचार करून योग्य तो निर्णय घेऊन या कोरोना साथीच्या परिस्थितीत प्रत्येक पालकाला आर्थिक विवंचनेतून बाहेर निघण्यास मदत करावी. अशी आग्रही मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. 


              प्रितम म्हात्रे यांच्या या मागणीनुसार शिक्षण खात्याने जर याबाबत विशिष्ट धोरण करून पालकांना दिलासा दिला तर फक्त पनवेलचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पालकवर्ग त्यांना दुवा देतील यात शंका नाही.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर