सुपरस्टार उभरता अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या...





 

महेंद्र कांबळे - मुंबई प्रतिनिधी

 

बॉलिवूडमधून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्याच्या घरातील नोकराने सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिला आणि पोलिसांना या घटनेची सूचना दिली. सुशांतला महेंद्रसिंग धोनीचा जीनवपट'एम. एस.धोनी' चित्रपटातून खरी ओळख मिळाली होती.

 

 

सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात बॅकअप डांसर म्हणून केली होती. तसेच सुशांतने सर्वात आधी 'किस देश में है मेरा दिल' नावाच्या मालिकेतून अभिनय केला होता, पण त्याची खरी ओळख त्याला एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या सिरियल मधून मिळाली. नंतर त्यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 'काय पो छे' या हिंदी सिनेमा मधून केली होती. त्यानंतर 'शुद्ध देसी रोमांस' आणि भारतीय क्रिकटचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा बायोपिक 'एम एस धोनी' मध्ये काम केले, त्यानंतर आमिर खानसोबत 'पीके' चित्रपट आणि 'छिछोरे' चित्रपटातही कामकाम केले होते. आणि आश्चर्यची बाब म्हणजे, छिछोरे चित्रपटात सुशांतने आत्महत्या न करण्याचा संदेश दिला होता. पण, त्यानेच आज आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवल्याने  सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

अद्याप आत्महत्ये मागचा खुलासा झाला नाही. सुशांतने आपली शेवटची सोशल मीडिया पोस्टमध्ये आईचा फोटो शेअर करत, लिहिले होते . - "अश्रूंच्या थेंबांतून अंधुक होत जाणारा भूतकाळ. एकीकडं, कधीच अंत नसलेली स्वप्नं हास्याचं इंद्रधनु फुलवताहेत आणित्याचवेळी समोर हे क्षणभंगुर जगणं. या दोन्हींमधून मी काय निवडायचं, आई?"


 

 



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर