समाजसेवक किरण मढवी यांचे मरणोत्तर नेत्रदानाचे संकल्प
१० जून- जागतिक दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून उलवे येथील समाजसेवक किरण एकनाथ मढवी यांनी आज लक्ष्मी चँरिटेबल ट्रस्ट पनवेल येथे मरनोत्तर नेत्रदान संकल्प अर्ज भरुन नेत्रदान करण्याचे निर्धार केले. त्याप्रसंगी किरण मढवी यांना डॉ. सचिन भुमकर, डॉ. भुपेश जैन आणि डॉ. रिटा धामणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी लक्ष्मी चँरिटेबल ट्रस्टचे समाजिक कार्यकर्ते विनोद पाचघरे आणि समाजसेवक प्रकाश पाटील आणि मनोज पाटील आदी उपस्थित होते. यावेळी लक्ष्मी चँरिटेबल ट्रस्टनी समाजसेवक किरण मढवी यांच्या या कार्याबद्दल कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment