लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  दैनिक किल्ले रायगडचे डिजिटल क्षेत्रात पदार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन वाचकांसाठी आता वेबसाईट, युट्युब , फेसबुक आणि ट्विटर पेज


 

 

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल येथील सर्वात जुने वर्तमानपत्र असलेल्या दैनिक किल्ले रायगडने आता डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. वेब पोर्टल, युट्युब, फेसबुक व ट्विटर पेज सुरू करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डिजिटल किल्ले रायगडचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला.
५२ वर्षापूर्वी लक्ष्मण पांडुरंग उर्फ ल. पा. वालेकर यांनी किल्ले रायगड वृत्तपत्र सुरू केले. पनवेलच  नव्हे तर रायगड जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या या साप्ताहिकाचे रूपांतर पुढे दैनिकात झाले. पत्रकारितेच्या या अखंड प्रवासाला अर्ध शतकापेक्षा जास्त वर्ष झाली. कालानुरूप दैनिक किल्ले रायगडने स्वतःमध्ये बदल केला. वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या वृत्तपत्राने आता डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्या अनुषंगाने वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त आता वाचकांना फेसबूक, ट्विटर आणि युट्युब वर  दैनिक किल्ले रायगडने  प्रसिद्ध केलेल्या बातम्या वाचता येतील. एका क्लिकवर आपल्या परिसरातील घडणार्‍या घटनांचे सर्व अपडेट मिळणार आहेत. किल्ले रायगड चे संपादक प्रमोद लक्ष्मण वालेकर यांच्या संकल्पनेतून दैनिक किल्ले रायगड डिजिटल झाले आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले. तर ट्विटर आणि फेसबुक पेजचा शुभारंभ महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.  विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी क्लिक करून युट्युब चॅनलचे उद्घाटन केले. प्रमोद वालेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात दैनिक किल्ले रायगड च्या वाटचालीचा आढावा घेतला. डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकण्या पाठीमागचा उद्देश त्यांनी विशद केला. माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांपर्यंत जलद गतीने विश्वासाह्यर्र् बातम्या पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. डिजिटल किल्ले रायगड मध्ये चालू घडामोडींपासून मनोरंजन, आरोग्य, कथा, कविता अशाप्रकारे अनेक विषयांवर माहिती प्रसारित होणार असल्याचेही वालेकर यांनी सांगितले. डिजिटल किल्ले रायगडच्या कार्यकार्य संपादक ऋतुजा वालेकर -तटकरी यांनी उपस्थितांचे समयोचित शब्दात आभार मानले.

किल्ले रायगड सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे दैनिक
ल.पां. वालेकर यांनी सुरू केलेल्या दैनिक किल्ले रायगडने  आजपर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम केले आहे. वालेकर काकांचा वारसा आता त्यांची तिसरी पिढी चालवत असल्याबद्दल मनोमन समाधान वाटत आहे. एकेकाळी किल्ले रायगड ची छपाई ही खिळे लावून केली जात असे. त्यावेळी उमेश मानकामे आणि मी  याठिकाणी येऊन ते पाहात असत . त्यानंतर ऑफसेट आणि आता डिजिटल असा मोठा बदल दैनिक किल्ले रायगड मध्ये झालेला आहे. जी वस्तुस्थिती आहे ती मांडणे ही या दैनिकाची परंपरा आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. -  आमदार प्रशांत ठाकूर

 

कोट- 
वर्तमानपत्र हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेले आहेत . अवतीभोवती समाजात काय घडते हे सर्वकाही बातमीच्या माध्यमातून आम्हा सर्वांना समजते. दिवसेंदिवस या माध्यमांमध्ये बदल घडत चालले आहेत. सध्याचे युग डिजिटल असल्याने आता काही क्षणातच आपल्याला घडामोडी समजतात. गेल्या एक-दोन महिन्यात डिजिटल माध्यमांचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. दैनिक किल्ले रायगड ची परंपरा मोठी आहे. आज त्यांनीसुद्धा या क्षेत्रात पाऊल टाकले त्याबद्दल सर्व किल्ले रायगड परिवाराला मनापासून शुभेच्छा-  डॉ कविता चौतमोल, महापौर पनवेल महानगरपालिका

 

कोट- 
दैनिक किल्ले रायगड हे पनवेल मधील सर्वात जुने वर्तमानपत्र आहे. काळानुरूप या वर्तमानपत्रांमध्ये मोठे बदल घडत गेले. त्यांनी वेबपोर्टलसह, फेसबूक, ट्विटर आणि यूट्यूब चॅनल सुरू केला. या माध्यमातून पनवेल करांना अत्यंत जलद अपडेट मिळतील. डिजिटल किल्ले रायगडला शुभेच्छा- परेश ठाकूर, सभागृहनेते पनवेल महापालिका  

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर