इरफानभाई व तबरेझ यांचे महान मानवतावादी कार्य लॉकडाउन पासून गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,सर्वसामान्यांचे 'देवदूत'असल्याची भावना




 


 

 

पनवेल ३० मे (वार्ताहर) 

 

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात गरीब, गरजू,मजूर कामगार,आदिवासी सर्वसामान्य सर्वधर्मीय जनता यांच्यासाठी सामाजिक कार्यकर्ते इरफानभाई तांबोळी,तबरेज कच्छी आदी देवदूत ठरले आहेत.या दोघांनी लॉकडाउनच्या सुरवातीपासून गरीब गरजूंना अन्नाची,जीवनावश्यक वस्तूंची सोय केली.त्यामुळे दोघांना मानवतेचे 'मसिहा' म्हटले जाते.

  लॉकडाउनपासून गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याच त्याच बरोबर पवित्र रमजान महिन्यामध्ये ३०   दिवस इफ्तारीमध्ये १५० कुटुंबांना अन्नधान्यासह सर्व मदत पुरविली.तसेच पायी चालत जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना मोठ्या प्रमाणात पुलाव, फळे, बिस्कीट, पाणी याचे वाटप केले. ईद सण साजरा करण्यासाठी गरिब मुस्लिम समाजातील लोकांना दूध, सुखा मेवा,शेवई, साखर घरपोच दिल्या. झोपडपट्टीतील गरजू लोकांना कोणताही भेदाभेद न करता पुलावाचे अहोरात्र वाटप केले.

    आजही पनवेलच्या शहर व ग्रामीण भागात इरफानभाई तांबोळी, तबरेज कच्छी आणि त्यांच्या टीमचे अन्नधान्य वाटप सुरू आहे.लोकांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. लॉकडाउन होऊन जवळ-जवळ दोन महिने होऊन गेले तरीही इरफानभाई व तबरेज कच्छी यांचे मदतकार्य सुरू आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील गोरगरीब जनता त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे आभार मानत आहे.

   सामाजिक कार्यकर्ते इरफानभाई व तबरेज यांना या मानवतावादी कार्यात समाजसेवक अल्ताब सय्यद,अनस मिस्त्री,वाजिद तांबोळी,मजहर कच्छी, जावेद तांबोळी,इस्माईल तांबोळी,सुफीयान तांबोळी यांची साथ लाभत आहे.त्यामुळे गोरगरीब जनता या सर्वांचे आभार मानत आहेत.


 

 



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर