आमदार महेश बालदी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
भंगारपाडा येथील गरीब गरजूंना मदतीचा हात
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पुढाकार
पनवेल (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून गेल्या अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. भंगारपाडा येथील अशा गरीब आणि गरजूंना तसेच रिक्षाचालकांना रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. शनिवारी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते या गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊन च्या काळात अनेकांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे रोजगार पूर्णपणे बंद झालेला आहे. विशेष करून रिक्षाचालकांची अतिशय बिकट अवस्था आहे. अशा गरिब व गरजूंसाठी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या अडीच महिन्यांपासून अन्नदान तसेच अन्नधान्य वाटपाचे काम सुरू आहे. शनिवारी भंगारपाडा गावात विकास मंडळाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या माध्यमातून गरजवंतांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मच्छिंद्र कटेकर, समीर कटेकर, गजानन कटेकर, गुरुनाथ गोसावी, कृष्णा कटेकर, राम कटेकर, नकुल कटेकर, जनार्धन कटेकर, भास्कर दामडे उपस्थित होते. ग्रामस्थांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे या मदतीबाबत आभार मानले.
Comments
Post a Comment