करंजाडे कॉलनीत अर्सेनिक अलबम ३० गोळ्यांचे १२०० कुटुंबाना वाटप
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे कॉलनीत रोगप्रतिकार वाढविणाऱ्या अर्सेनिक अलबम ३० गोळ्यांचे १२०० कुटुंबाना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या तर्फे मोफत वाटप करण्यात आले.तसेच २००० मास्क चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास करंजाडे विभाग अध्यक्ष कर्णा शेलार, सुनील साबळे, करंजाडे भाजप शहर अध्यक्ष मिरेन्द्र शहारे, करंजाडे ग्रा प सदस्य नाथा भरवाड, निलेश गायकवाड, भरत साबळे ,संतोष विखारे, अजय साबळे, नंदकुमार फ़डके, सागर आंग्रे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (छाया-हर्षद कोळी)
Comments
Post a Comment