कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता     तातडीने कडक उपाययोजना   - सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी 


 

पनवेल(प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता तातडीने कडक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. 

        या संदर्भात त्यांनी निवेदनही दिले आहे. यावेळी चर्चेसाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, पोलीस उपायुक्त श्री. दुधे, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील आदी उपस्थित होते. 

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि,  पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वैश्विक कोरोना महामारीने थेमान मांडले आहे. रुग्णांची दर दिवसागणी १०० ने भर पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे जनतेमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासक म्हणून आपण या स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक पाऊले उचलणे हे आता काळाची गरज बनून गेली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत कडक पद्धतीचे लॉकडाऊन अंमलात आणण्याचे अत्यंत गरजेचे आहे. हे लॉकडाऊन किमान सात दिवसाचे असावे ज्यामुळे ही परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणण्यास मदत होईल. जर काही कारणामुळे लॉकडाऊन जाहिर करण्यास समस्या असेल तर मार्केट परिसरातील गर्दी नियंत्रणात आणण्यास आणि कोरोना बद्दल जास्तीत जास्त जनजागृती करण्यास प्रयत्न करावे. 

त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींची जास्त प्रमाणात कोरोना चाचणी घेणे व त्यांचे रिझल्ट्स लवकरात लवकर उपलब्ध करुन देणे व सदर रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे. परंतु दुर्दॅवाने असे घडताना दिसुन येत नाही. त्यामुळे अनाठाई रुग्ण संख्या वाढ असल्याचे आढळून येत आहे. कामातील हि बेपरावाही व दिरंगाई निषेधार्थ आहे.  जास्तीत जास्त संख्येच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधोल रुग्णांचा शोध घेणाऱ्या यंत्रणांना त्यांनी काम तत्परतेने करण्याचे आदेश द्यावेत. तसेच टेस्टचा रिपोर्ट लवकरात लवकर देण्याचे आदेश तपासणी लॅबना द्यावेत व बाधित रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करावी, अशीही महत्वपूर्ण मागणी त्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून केली आहे.  यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर