आपली काळजी आपणच घ्या आणि कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवा - महादेव महाडिक वाडाम्बा
म्हसळा / प्रतिनिधी
आपल्या गावी बरीचशी मंडळी मुंबईहून गावी आली आहे. गावचे अध्यक्ष आणि सरपंच हे सरकारने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे नियमित सांगत असतात ते आपल्या सर्वांच्या चांगल्यासाठीच आहे, त्यामध्ये नाराज होऊ नका.
आपण मुंबई मधून कितीही सुरक्षित आलो असलो तरी रस्त्यांनी येतांना पेण जवळ कौरंटाईन करण्यासाठी बुथ बांधले आहेत तिथे सर्वांचीच फार गर्दी असते, सोशल डिसटंस तिथे पाळले जात नाही. हे आपण सर्वांनी पाहिलेले आहेच, म्हणूनच गावी आल्यानंतर कौरंटाईन झाल्यानंतर नियम पाळणे आवश्यक आहे.
मी गावी आल्यानंतर माझ्या जे निदर्शनास आले ते थोडक्यात...
गावी प्रत्येकामध्ये भिती चे वातावरण जाणवले अर्थात हे सर्व कडेच असणार कारण वातावरणच तसे आहे. पण भितीमय आपले मन असलेतर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होत जाते, आणि दुसरच काही आजार निर्माण होण्याची शक्यता असते.
पण बरीचशी मंडळी (जे कौरंटाईन नाहीत) आपल्या आवारात उदा. समोरचे अंगण परसावनात तोंड पुर्ण बांधून फिरतात, मंडळी आपापल्या आवारामध्ये आपल्या शिवाय कोण जात नाही तिथे असे करण्याची गरज नाही कारण हा संसर्गजन्य आजार आहे तो दुसर्या च्या संपर्कातून च होतो हे आपल्याला माहीतच आहे.
कारण नसतांना तोंड बांधून ठेवल्याने त्याचे दुष्परिणाम होतात...
कारण त्यामुळे फफ्फुसाला पुरेसा आॅक्सिजनचा पुरवठा होत नाही मग फफ्फुस कमजोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार किंवा ईतर कोणताही आजार उद्भवू शकतो आणि हा आजार फफ्फुसावरच आक्रमण करतो.
फफ्फुस कार्यप्रणाली
लहान मुल जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो रडतो तेव्हाच आपल्या फफ्फुसातील २० ते २५ टक्के वायुकोष उघडली जातात, नंतर आयुष्यात स्वच्छ हवेच्या ठिकाणी किंवा निसर्ग सानिध्यात राहण्याचा योग आला किंवा योगा केले तर बाकीचे थोडे फार ओपण होतात, यावर आपल्या रक्ताचे शुध्दीकरण चालू असते आणि त्यासाठी पुरेसा श्वास प्रश्वास करुन फफ्फुसाला प्राणवायू (Oxygen) मिळणे फार गरजेचे आहे.
पण गावामध्ये फिरतांना किंवा सोशल डिसटंस वरुन कोणाकडे ही बोलतांना मास्क लावणे गरजेचे आहे.
रोगप्रतिकारक शक्ती
रोज सकाळी लवकर उठून नियमित योगासने, सूर्यनमस्कार, माँरनींग वाॅक किंवा व्यायाम आणि प्राणायाम, स्वछ हवा घेणे पण आपल्याच आवारात, गावात नाही.
आणि सकस आहार.
वैश्विक शक्ति Cosmic Energy
कोरोना विषाणू आपल्या नजरेने दिसत नाही पण माणसांचे प्राण घेतो, तसेच ही
वैश्विक शक्ति आपल्या शरीरा भोवती एक कवच तयार करते ते नजरेने दिसत नाही पण माणसांचे १०० टक्के प्राण वाचवु शकते, आता ती निर्माण कशी करायची तर...
आपण बरीचशी मंडळी बैठकीला जातो, आपली उपासना वाढवायची, जी मंडळींचा आध्यात्माचा दुसरा मार्ग त्यांनी तारक मंत्र *ॐ नमःशिवाय* या मंत्राचा कमीतकमी १० माळी नामजप करायचा.
होणारे फायदे
तुमच्या भोवती वैश्विक शक्तिचा कवच (Cosmic Energy Vora) तयार होईल.
सात्विक भाव वाढीस लागतो.
नम्रता येते
आणि चेहर्यावर एक वेगळ तेज येते
मनातील भीती निघून जाते
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
ध्यान
ध्यानाला बसताना कोणत्याही सुखासनात बसने.
शरिर पूर्णतः सैल सोडून श्वासावर लक्ष केंद्रित करुन भ्रुकुटी मध्यावर (टीळा लावतो ते ठिकाण) आतुन बघण्याचा प्रयत्न करणे.
मन फार चंचल आहे ते स्तीर राहणार नाही, मग त्या मनाला घेऊन आपण जिथे सकारात्मक ऊर्जा आहे, उदा. आपण पाहिलेले मंदिर तीर्थक्षेत्र अशा ठिकाणी नेऊन तीथे देवतेचे दर्शन घेऊन मानस पुजा करणे (सर्व ध्यानाला बसलेल्या ठिकाणावरुन मनानी करावयाचे आहे).
आध्यात्मामध्ये सांगितले आहे कि प्रत्येक माणसानी आपले वय आहे कमी कमी तेवढे मिनीट ध्यान करावे. (उदा. ज्याची ५० वर्ष वय आहे त्यांनी ५० मी.)
होणारे फायदे
चंचल मन स्थिर होते
सकारात्मक ऊर्जा वाढते
बी पी नॉर्मल होयला मदत होते
तुमच्या मध्ये एक डिसीजन पाॅवर तयार होते
तुमच्या मध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.
सतत टीव्ही वरील बातम्या बघून प्रत्येकात नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ती अशा परिस्थितीत फार घातक आहे, त्यामुळे वरिल प्रकार करणे फार गरजेचे आहे.
आणि या रोगाने जी मानसं आपल्या तून गेली त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी पडली म्हणून.
मंडळी 'कोरोना' रोगावर आज पर्यंत औषध नाही त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवुन मन प्रसन्न आनंदीत ठेवने एवढेच आपल्या हातात आहे.
आपणसर्व गाव बांधिलकी आणि एकात्मता राखून कोरानावर विजय मिळवू या..
✍️ श्री. महादेव यशवंत महाडिक
मुक्काम - वाडांबा
तालुका - म्हसळा,
जिल्हा - रायगड
Mo. - 9222151619
Comments
Post a Comment