अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळच्या  हाहाकारा नंतर ची परिस्थिती



(संदेश घोलप-श्रीवर्धन): निसर्ग चक्रीवादळ दोन दिवसापूर्वी कोंकण किनारपट्टीला येऊन धडकलं हवामान खात्याने दिलेल्या अंदाजा नुसार हे वादळ अतिसंहारक चक्रीवादळात परावर्तीत झालं चक्रीवादळच केंद्र बिंदू असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गाव अनेक कुटुंब व संसार  उघड्यावर पडले समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे झाडे कोसळून पडली, विद्युत खांब कोसळले, घरांवरचे छप्पर उडाले, घरांच्या भिंती कोसळल्या,घर कोसळली,अनेकांच्या घरांवर झाडे पडली आहेत कोळी बांधवाच्या होड्यांचं तसेच वाहनाचा देखील नुकसान झालं होत्याच नव्हतं झालं स्वर्ग भूमी म्हणून ओळखलं जाणाऱ्या कोंकणच अतोनात नुकसान झालं आणि कोंकणच पुर्ण चित्रच पालटलं आंबा,सुपारी,नारळ,काजूची व इतर झाड मुळांसहित उलमळूनपडली त्यामुळे विद्यतु पुरवठा खंडित झाला असून रस्त्यावर झाडें पडली असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे सर्व नागररिक अंधारात आहेत पुढील काही दिवस त्यांना अंधारात रात्र काढावी लागणार आहेत लाईट नसल्याने पाणी नाही अन्नधान्य भिजलं आहे आजारी माणसांना औषधांची गरज आहे काही जणांना दुखापती झाल्या आहेत  लहान मुलं तसेच गरोदर महिलांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं गरजेचं आहे अवघे कोंकणकर निसर्ग चक्री वादळाने भयभीत झाले आहेत गाई गुर ही त्याला अपवाद ठरत आहेत त्यांना मदतीची गरज आहे वाहतूक बंद असून मदत देखील पोहचू शकत नाही तरी कोंकण कर जिद्दीने आणि मोठया चिकाटी ने पुन्हा आपलं घर आपला संसार आपलं कुटूंब आपलं गाव आणि आपलं कोंकण उभं करायचं काम करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी रायगड दौरा करून जिल्ह्याला तातडीची 100 कोटी ची तात्पुरती मदत जाहीर केल्याने कोंकणकरांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.त्यांना  कोंकणकरांनी आज पर्यंत अनेक पावसाळे पाहिले अनेक वादळ पाहिली पण अस वादळ त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं  निसर्ग चक्रीवादळ कोकणात भीषण वाताहत मागे ठेऊन गेले. काही गावं तर पूर्णपणे घास घेतल्यासारखी उजाड झाली आहेत. अनेक घरांवर झाडें पडली आहेत. छपरं उडून गेली आहेत. इलेकट्रीसिटी चे पोल्स तुटून आडवे पडले आहेत. त्यामुळे लाईट कधी येतील सांगता येणार नाही.तरी जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने कोकणातला माणूस आपत्तीवर जय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.  गायीगुरं, माणसं त्रासातून जात आहेत. या वादळाने कोकणातल्या किनारी प्रदेशातली बरीच गाव नेस्तनाभूत करून टाकली आहेत. नारळ पोफळीच्या बागांचे नुकसान जास्त झाले आहे. बऱ्याच भागामध्ये संपर्क झालेला नाही त्यामुळे किती नुकसान झाले याची तीव्रता लोकांपर्यंत पोचणे कठीण झाले आहे.या नुकसानाची भरपाई होणे कठीण आहे. अकरा वर्षांपूर्वी आलेल्या फयान वादळा पेक्षा जास्त  तीव्रतेने नुकसान झाल्याचे समजते. उत्तर रत्नागिरी किनारी प्रदेशातील गावं तसेच रायगड जिल्ह्यातील किनारीपट्टी लगतची गावं या वादळामध्ये प्रभावित झाली आहेत.चक्रीवादळ म्हणजे नेमक काय व ते कस तयार होत त्याच्या बद्दल थोडस जाणून घेऊया -समुद्रातील एक मध्य बिंदू भोवती म्हणजेच कमी दाबाच्या प्रदेशाभोवती जेव्हा चहूबाजुंनी वारे वाहण्यास सुरवात होते त्यावेळी वादळ तयार होते चक्रीवादळ हे घड्याळाच्या दिशेने वरून खाली खाली फिरते समुद्राचे तापमान हे चक्रीवादळाच्या निर्मितीतील महत्वाचे घटक असते वातावरणातील उष्ण आणि आद्र् हवेच्या पुरवठ्यामुळे वादळाला पोषक वातावरण मिळते चक्रीवादळे समुद्राच्या पाण्याच्या उष्ण भागातील वाफेमुळे निर्माण होतात.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर