अश्वारूढ मावळे आणि झूल घातलेल्या हत्तींच्या शिल्पांमुळे  शिवाजी चौकाच्या सौंदर्यात भर


पनवेल(प्रतिनिधी) पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळया जवळ उद्यानात मंगळवार 9 जून रोजी अश्वारूढ मावळे आणि झूल घातलेल्या हत्तींचे शिल्प बसवण्यात आल्याने शिवाजी चौकाच्या सौंदर्यात भर पडली असून पनवेलकरांनी हे शिल्प  पहाण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी सकाळपासून त्याठिकाणी गर्दी केली होती. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणासाठी  केलेल्या या पाठपुराव्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत होते.    
       पनवेल  महानगर पालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी  महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण प्रस्तावाला स्थायी समितीच्या शुक्रवार 1 मार्च 2019 रोजी मनोहर म्हात्रे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या  तातडीच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी मे. सोनाली कन्स्ट्रकशन यांच्या न्युनतम एक कोटी 42 लाख 54 हजाराच्या निविदेला मान्यता देण्यात आली होती. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची त्याच जागी ऊंची वाढवणे आणि दोन्ही पुतळ्यांच्या परिसराचे सौंदर्यीकरणाची तरतूद आहे.  
            कोरोनामुळे  संपूर्ण देशात 22 मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यामुळे  शिवाजी चौकातील सौंदर्यीकरणाच्या काम बंद झाले होते. जून महिन्यापासून या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून मंगळवारी सकाळपासून मावळे आणि  हत्तींचे पुतळे बसवण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. या परिसराचे संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे. 528 चौरस मीटर या जागेत 100 मीटर चौथरा बांधण्यात आला आहे. त्याची उंची साडेपाच फूट इतकी आहे. त्याचबरोबर पाठीमागील भिंत बांधण्यात आली आहे. परिसराला पाच फुटांचे संरक्षक भिंत बांधली आहे. यामध्ये जाळीचे आवरण करण्यात आले आहे. या ठिकाणी 11 दगडी बुरुजांची बांधणी करण्यात आली आहे.  
       सदर बांधकाम 20 मार्चपर्यंत सुरू होते, परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे 22 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने सुशोभीकरणाचे काम थांबविण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सहा फूट उंचीचे 15 मावळ्यांचे शिल्प उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर आठ फूट उंचीचे दोन हत्ती, घोडे, दोन तोफा या ठिकाणी बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर परिसरात हिरवळ आणि विद्युत रोषणाई ही करण्यात येणार आहे. यामध्ये शिवकालीन वेगवेगळ्या प्रसंगाचे एकूण चौदा चौदा फ्रेम असणार आहेत.

कोट : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी इतक्या सुंदर पद्धतीने उभारले जाईल अशी कल्पनाच केली नव्हती. येथिल मावळे हत्ती पाहून इतिहास जिवंत झाल्या सारखा वाटतो. असे स्मारक बनवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांना धन्यवाद ....  उन्मेष नागले

कोट: रायगडच्या प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचे बनवलेले स्मारक पाहून मनाला समाधान मिळते. येथिल  अश्वारूढ महाराजांचा पुतळा बाजूला  मावळे आणि झूल घातलेले हत्ती पाहून आपल्याला समाधान वाटते .यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ....  वैशाली पाटील


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर