सभापती संजय भोपी यांचा आरोग्य उपक्रम खांदा काॅलनीवासीयान साठी लवकरच देणार रुग्णवाहिका वाढदिवसाचा खर्च आरोग्य उपक्रमासाठी
पनवेल / राजेंद्र कांबळे
पनवेल महानगरपालिका प्रभाग 'ब' चे सभापती संजय भोपी यांनी आपला वाढदिवस साधे पणाने साजरा करत वाढदिवसाच्या दिवशी होणारा खर्च या वर्षी आरोग्य उपक्रमासाठी वापरायचा ठरवले असून लवकरच आपण खांदा काॅलनीवासीयान साठी एक रूग्णवाहिका लोकार्पण करणार आहोत अशी घोषणा त्यांनी केली
कोविड 19 विरुद्ध संपूर्ण देश लढत असताना आपणही या पुढे केवळ लोकप्रतिनिधी नाही तर एक आरोग्य सेवक म्हणून काम करणार आहोत याचीच देशाला गरज आहे यापुढे आपणा सर्वांना काळजी घेण्याची गरज आहे आपण देखील एकमेकांची काळजी घेतली पाहिजे असे संजय भोपी यांनी सांगितले
संजय भोपी यांनी गेली दोन महिने कोरोनो प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका कर्मचारया बरोबर विशेष मेहनत घेतली अनेक सोसायटीमध्ये निर्जंतुकीकरण करुन घेतले कोरोणो रुग्णांची माहिती खांदा काॅलनीवासीयाना दिली. कोरोणटाईल पेशंटच्या अडचणी महापालिकेला कळवल्या अनेक गरजूना मोफत अन्न धान्य उपलब्ध करून दिले कोविड योध्याचया समस्या सोडविल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गेले दोन दिवस ते विविध सोसायटीत डाॅक्टरान बरोबर रोगप्रतिकारक औषधाचे वाटप करत आहेत त्यांच्या या कामामुळे त्याना नुकतेच कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले अशा समाजसेवा काचा वाढदिवस साधेपणाने साजरा होत पुढील वर्षी आपण आरोग्य सेवक म्हणून रहाणार असून आपण आपल्या अडचणी आम्हाला कळव्यावावत आम्ही त्या सोडविण्याचा प्रयत्न करू असे आवाहन त्यांनी खांदा काॅलनी वासीयाना केले.
Comments
Post a Comment